हेमंत जाधव
संग्रामपूर/तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संग्रामपूर व सोनाळा पोलिस स्टेशनला निवेदन देऊन २१ मार्च २०२३ पासून पोलिस स्टेशन समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा लेखी निवेदनातुन दिला आहे. नविन पिढीतील काहि प्रमाणातिल युवक नशेच्या आहारी जाऊन आपल्या मृत्यला आमंत्रण देत आहेत.
अशा वाढलेल्या व्यसन विकृतीला आळा घालण्यासाठी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी मतदारसंघात समाज प्रबोधनाचे सतत कार्यक्रम आयोजित करून व्यसन मुक्त मतदारसंघ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता तालुक्यातील अनेक गावांमध्ये दारु विक्री,मटका व काही भागात सर्रास जुगार चालु आहे. कदाचित पोलिस स्टेशनला याची कल्पना असेलच. तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हे अवैध धंदे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनवर होत आहे.
त्यामुळे सामाजिक फार मोठी हाणी होत आहे. तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तरुण पिढी वेसणाच्या आहारी जाऊ नये. रात्री अपरात्री वाईट घटना घडु नये, याकरीता पोलिस प्रशासनाने विशेष लक्ष देऊन तालुक्यात चालु असलेले अवैध दारु विक्री,मटका व जुगाराचे क्लब बंद करण्यात यावे.
अवैध धंदे करणाऱ्यांची अधिक हिंमत वाढल्यास गावा गावात गुंडप्रवृत्ती करणाऱ्यांची संख्या अधिक वाढेल याचा त्रास जण सामान्य माणसाला होईल. करीता तत्काळ तालुक्यात सर्रास चालु असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी दि.२१ मार्च २०२३ पासुन संग्रामपूर येथे पो.स्टे.समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी लेखी निवेदनातून दिला आहे.