अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत मद्यधुंद शिक्षकाने चक्क जीन्स पॅन्ट मध्येच लघु शंका केली आहे. शाळेला भेट देणाऱ्या पालक आणि गावकऱ्यांना शिक्षक चक्क मध्यातून अवस्थेत टेबलावर पाय ठेवून झोपताना दिसलेत.
ही अवस्था बघून शाळेला भेट देणारे उपसरपंच सह गावकरांनी यामध्ये धुंद अवस्थेत असलेल्या शिक्षकाचे छायाचित्रीकरण देखील केले आहे. आधीच समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या मेळघाट परिसरात विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी पालक प्रयत्नात असतात.
मात्र शाळेतील शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवणी देण्याऐवजी स्वतःच मद्यधुंदीत राहतात. त्यामुळे अशा शिक्षकांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी येथील आदिवासी बांधवांनी केली आहे.