सांगली – ज्योती मोरे
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील हॉलीबॉल ग्राउंड, नंदनवन कॉलनी, सिद्धिविनायक हाउसिंग सोसायटी, निष्ठा मारुती मंदिर, श्रीनगर आदी भागात नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून ज्येष्ठ नागरिकांसह, महिलांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल इथल्या स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.