Saturday, November 23, 2024
Homeराजकीयमिरज मतदान क्षेत्रासाठी 1437 कोटींचा निधी विकास कामांचा बॅकलॉग...पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे

मिरज मतदान क्षेत्रासाठी 1437 कोटींचा निधी विकास कामांचा बॅकलॉग…पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे

सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.

मिरज विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी शासनाकडून 1437 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, पुढील महिन्याभरात ही सर्व काम सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान या निधीतून सगळ्या वार्डांसह, सर्व गावात विकास कामे होतील. गेल्या अडीच वर्षात जो बॅकलॉग राहिला होता, तो आता गतिमान होईल.पुढील आचारसंहितेच्या अगोदर यांच्या सर्व ऑर्डर निघून पावसाळ्याच्या आधी ही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.असेही पालकमंत्री खाडे यांनी म्हटले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: