Viral Video : रंगांचा सण, होळी संपूर्ण भारतात अजुनही साजरा केल्या जात आहे. होळीच्या वेळी अनेक कॉमेडी व्हिडिओ व्हायरल होतात. पण आता एका शिक्षकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तो खूप प्रेरणादायी आहे. ज्यामध्ये एका मास्तरांनी आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीत वेगवेगळे रंग शिकवतांना एक अतिशय वेगळीच पद्धत शोधून काढली.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बिहारचा आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. होळी स्पेशल क्लासमध्ये एका मास्तराने इंग्रजीमध्ये ब्लॅकबोर्डवर वेगवेगळ्या रंगाचे नाव लिहिले आहेत. यासोबत हिंदी नावांसह सात रंग लिहिले आहेत. जे त्यांनी विद्यार्थ्यां समोर गाणे गाऊन शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याची ही अनोखी स्टाइल लोकांनाही आवडली आहे.
हा व्हिडिओ @Eagle_View नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत युजरने लिहिले की, गुरुजींचा होळीचा कोर्स….हा व्हिडिओ समस्तीपूरमधील त्याच शिक्षकाचा आहे जे बरेचदा व्हायरल होतात. वेगवेगळ्या रंगांची नावे इंग्रजीत गाणे आणि मुलांना हिंदीत अर्थ समजावून सांगणे. व्हिडिओमध्ये पहा बैजनाथ राजक कसे शिकवत आहेत होळीचा धडा.
विशेष म्हणजे, हे तेच शिक्षक आहेत ज्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एकदा दारूबंदीवर गाणे गायले होते…