Saturday, September 21, 2024
HomeMarathi News Todayशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतिने महागाई व घरगुती गँस...

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतिने महागाई व घरगुती गँस सिलेंडर दर वाढ बाबत स्वयंपाक करुन केले आदोलन…

आज दि ०८/०३/२०२३ बुधवार रोजी मा.उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यलयाच्या गेट समोर शिवसेनाउध्दवबाळासाहेब_ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतिने महागाई व घरगुती गँस सिलेंडर दर वाढ बाबत स्वयंपाक करुन आदोलन करण्यात आले.अदानी अंबानीच्या इशार्यावर केन्द्रातील व मोदी सरकार व राज्यातील फडवणीस सरकार सर्वसामान्य नागरिकांचे जगने सुध्दा मान्य करायला तयार नाही.

2014 च्या मा.पंतप्रधानांनी डाँ.मनमोहनसिंह यांना घरगुती गँस सिलेंडरचे भाव 450 रुपये असतांना मोदीच्या केन्द्रातील मंत्री असलेल्या स्मृती ईरानीने बांगड्या पाठवुन रस्त्यावर सिलेंडरवर बसुन मंत्रीपद मिळवण्यासाठी आदोलन केले होते.आज सिलेंडरचे भाव 1150-1200 रुपयांच्या दराने सर्वसामान्य नागरिकांना घ्यावे लागते.इधनाच्या धुरा पेक्षा जास्त अश्रु महिलांचे महागाईमुळे निघत आहेत.

देशात राज्यात बेरोजगारीला पारावार नाही त्यात ही मरणाची महागाई अश्या पेशवाई धोरणाने समाजातील बहुजन समाजासह संपुर्ण जनता आज त्रस्त झाली आहे.मोदी,फडणवीस यांच्या चुकिच्या धोरणाबाबत आजचे आदोलन करण्यात आले.

बुलढाणा महिला आघाडी जिल्हाप्रमुख मा.सौ चंदाताई बढेव महिला शहर प्रमुख सौ.श्रुतीताई पतंगे यांच्या नेत्रुत्वात आदोलन करण्यात आले.आदोलनला खामंगाव शहरातील प्रत्येक भागातील महिला स्वयमस्फुर्ती ने उपस्थित होत्या.

बुलढाणा जिल्हा उपजिल्हाप्रमुख शैलेजाताई ठाकरे उपजिल्हाप्रमुख सौ.भारतीताई चिंडाले, ज्योती तारापुरे,बबीता हंट्टेलताई,लता गावंडे,सुरेखाताई चिलवंत,गंगाताई भंट्टड,मायाताई इंगळे,संगीताताई मोरे,शोभाताई सावडे,नंदाताई सावडे,अनिताताई क्षिरसाट,लताताई काचकुरे,नंदाताई दुबे,व महिला आघाडीच्या सर्व पद अधिकारी उपस्थित होते तसेच निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: