- २००१ मध्ये झाले शहिद.
- देशासाठी शहिद होऊन गावाचे नाव उंचावले.
- परिवर्तन स्वयंसेवी संस्था यांचा पुढाकार.
नरखेड – अतुल दंढारे
नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील शाहिद रत्नाकर कळंबे याना लहानपणापासून देश सेवा करण्याची जिद्ध होती. एका गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेले व हलाकीची परिस्थिती असताना आपले शिक्षण पूर्ण करून देशसेवा करण्याची जिद्ध मनाशी बाळगता ते १९८८ मध्ये सैन्यात मराठा बटालियन मध्ये भरती झाले. सैन्यामध्ये असताना त्यांनी देशाच्या वेगवेगळ्या सीमांवर आपले कर्तव्य बजावले.
परंतु 5 मार्च 2001 मध्ये ऑपेरेशन रक्षक मोहिमेत असताना त्यांचा डोडा जिल्ह्यातील सिद्धी खोजा या गावाजवळ पहाटेला आतंगवादी हल्ला झाला व ते त्यात शहिद झाले. त्यांचे पार्थिव जलालखेडा या त्यांच्या मूळगावी आणण्यात आले होते. त्यांना श्रद्धांजली देण्याकरिता पंचकृषीतील हजारो नागरिक मोठ्या संख्येने त्यावेळी उपस्थित होते. ते जेव्हा शाहिद झाले तेव्हा त्यांना दोन वर्षाची एक लहान मुलगी होती. पत्नीवर जणू त्यावेळी दुःखाचा डोंगर कोसळला होता.
त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना कळंबे यांनी मुलीचा व सासू सासऱ्यांच्या सांभाळ केला. आपल्यालाही देश सेवा करता यावी म्हणून नेहमी सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. गावातील युवकांना शहीद रत्नाकर कळंबे यांची प्रेरणा घ्यावी म्हणून आमदार अनिल देशमुख यांच्या निधीतून तहसील कार्यालयाच्या पटांगणात त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. परिवर्तन स्वयंसेवी संस्था दरवर्षी शाहिद रत्नाकर कळंबे यांचा स्मृती दिन साजरा करत असतात.
तसेच दरवर्षी जागतिक दिनानिमित्य महिलांचा सत्कार करण्यात येतो यावेळी इयत्ता 10 वी मध्ये नरखेड काटोल तालुक्यातील प्रथम आलेली एस आर के इंडो पब्लिक स्कूल जलालखेडा येथील विद्यार्थिनी अबोली कडू हीचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे पोलिसमध्ये चांगलं काम करणाऱ्या वंदना मोहोड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या 24 व्या स्मृती दिनाला रत्नाकर कळंबे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे डॉ. भास्कर विघे, सरपंच कैलास निकोसे, माजी ग्राम पंचायत अतुल पेठे, कुलदीप हिवरकर, शिवनेसा जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे, प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे, माजी सरपंच प्रतिभा घोरमाडे, वीरपत्नी डॉ. अर्चना कळंबे, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, माजी सैनिक पुरुषोत्तम जोगेकर, रत्नाकर ठाकरे, अशोक राऊत, गंगाधर नागमोते, नबीर महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. तेजसिंग जगदाळे,, ग्राम पंचायत सदस्य कुलदीप हिवरकर, गणेश पेठे, मोठ्या संख्येने महिला व गावकरी मंडळी मोट्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमचे संचालन नरेंद्र बिहार व प्रास्ताविक मनोज खुटाटे यांनी केले. राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.