- विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन.
- 52 विद्यार्थ्यांनी तयार केले विज्ञान मॉडेल.
- जागतिक विज्ञान दीनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन.
नरखेड – जागतिक विज्ञान दिनानिमित्य एस. आर. के इंडो पब्लिक स्कूल जलालखेडा या शाळेत विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील 52 विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेल्स तयार करून प्रदर्शनीमध्ये ठेवले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून विचारातून अतिशय सुंदर व उपयोगी मॉडेल्स तयार केले होते. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वतीने विज्ञान विषयावर प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच विद्यार्थ्यांनी जागतिक विज्ञान दिनावर एक नाटिका सुद्धा सादर केली. विज्ञान प्रदर्शनित ठेवण्यात आलेल्या मॉडेल्स बद्दल पर्यवेक्षकांनी विद्यार्थाना माहिती विचारली असता विद्यार्थ्यांनी बनवलेले मॉडेल्स किती महत्वाचे आहे व त्यांचा भविष्यात काय उपयोग करता येईल हे पटवून सांगितले. विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक यश डेहनकर, द्वितीय क्रमांक शास्वत इंगोले तर तृतीय क्रमांक तेजस कनेरे व ब्रूवन राऊत यांनी पटकावला असून आराध्य पेठे, गुंजन राऊत, मयांक तायडे, प्रत्युष वंजारी, पारस पेठे, जतीने मातकर ,
नेहा अंतुरकर व चैताली अंतुरकर याना उत्कृष्ट मॉडेल बनवल्या बद्दल बक्षीस देण्यात आले. विज्ञान प्रदर्शनीला एकलव्य स्कॉलर सावरगाव च्या संचालिका पौर्णिमा दाडे, प्राचार्य एकलव्य स्कॉलर सावरगाव राजकमल ढोके, जीवन विकास महाविद्यालय येथील प्रा. देवेंद्र वासाडे, प्रा. रुपेश शेखार, प्राचार्य शुभांगी अर्डक व मोठ्या संख्येने पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थ्यांनी केले असून आभार प्रदर्शन रियाज पठाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुलोचना बोडखे, अश्विनी रेवतकर, हेमलता गोरे, राधा घोरसे व शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी बनवलेले मॉडेल्स अतिशय सुंदर व उपयोगी होते. के जी २ ते वर्ग ८ वि च्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला असून त्यांनी त्यांच्या कल्पनेतून अतिशय सुंदर असेल मॉडेल्स तयार केले होते. लहान पनापासून विद्यार्थ्यंमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवण्यासाठी नव्हे तर ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे.
प्रा देवेंद्र वासाडे जीवन विकास महाविद्यालय देवग्राम.
मराठी भाषा दिन साजरा
शाळेच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनावर मराठी भाषेतील नृत्य सादर केलं तसेच मराठी भाषेचे महत्व काय आहे हे त्याच भाषेत विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दातून ते पटवून सांगितले. तसेच आम्ही मराठी असल्याचा अभिमान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.