Friday, September 20, 2024
Homeराजकीयपक्ष संघटन मजबुतीला प्राधान्य द्या - माजी मंत्री रमेशचंद्र बंग…

पक्ष संघटन मजबुतीला प्राधान्य द्या – माजी मंत्री रमेशचंद्र बंग…

डिगडोह मंडळ राकांपा कार्यकर्ता मेळावा…

नागपूर – शरद नागदेवे

हिगंणा – गटातटाचे राजकारण करण्यापेक्षा पक्षनिष्ठा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन, सामान्य माणसाची संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून पक्ष मजबुती करिता प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री रमेशचंद्र बंग यांनी डिगडोह मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले. पुढे बोलताना बंग म्हणाले समाजात काम करताना जात धर्म पंथ यापेक्षा माणसावरील माणसाचं प्रेम आणि विचारधारेवरील निष्ठा जोपासना गरजेचे आहे.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग,जिल्हा परिषद सदस्या रश्मी कोटगुले, हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कावळे, माजी पोलिस उपनिरीक्षक विनोद सिंग, व्यंकटेश सहकारी पत संस्था डिगडोह सचिव वामणराव कळसकर, पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे, पोर्णिमा दीक्षित,माजी जि.प. सदस्य गोवर्धन प्रधान, माजी प.स. सभापती रेखा कळसकर,

नगरसेवक प्रशांत सोमकुवर, राकापा डिगडोह मंडळ अध्यक्ष प्रदीप कोटगुले, डिगडोह जागृती मंच चे मोनू सींग, युवक राकापा.वानाडोंगरी शहराध्यक्ष अनुप डाखळे, बी एन सिंग, सराटकर, वानखेडे,माजी सरपंच विजय मेश्राम, गंगाधर काचोरे, राजा तिवारी, मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्ता मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग , रश्मी कोटगुले सभापती सुषमा कावळे आदींनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला ग्राम पंचायत डिगडोह,निलडोह, इसासनी, वडधामना व नगर परिषद वानाडोंगरी परिसरातील (डिगडोह मंडळातील) शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सूत्रसंचालन व प्रास्ताविक राकापा जिल्हा उपाध्यक्ष लीलाधर दाभे यांनी तर आभार उपसभापती उमेश राजपूत यांनी मानले. यशस्वीते करिता शैलेश राय,दीपक हजारे,गणेश टेंभरे, रविकर चतुर्वेदी,हबलु चतुर्वेदी, विजय कोटगुले,अमर भांगे, नाजिम बेग,लकी पटले, असोक शर्मा, विजय डहाके, पंकज अंबादे,

सुनिल प्रधान,प्रकास वानखेड़े, अक्षय काळे,पिंटु राम, मुकेश राम, लखन सिंह, मिथुन टेभुरणे, निलेष बोरकर, रमेश बघेल, दिनेश हरीनखेडे, पुष्पराज सिंह ठाकुर, अनिल सिंह, वाघमारे,सहारे, सौ.मनोहर, कैलास सिंग, संजय तिवारी, संजय सिंग, माजी पोलिस निरिक्षक भुसारी, उधोजक सुभाष यादव, आदीनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: