वन विभागातील सर्वात मोठी कारवाई होण्याची शक्यता.
पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यांतील आलेगाव वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पांढुणाॅ ते सोनुना वन विभागातील रस्त्यामधील परवानगी पेक्षा जास्त अवैध उत्खनन व कोकल्यांड जेसीबी च्या सहायाने अवैध झाडाची कत्तल व विल्हेवाट लावण्यात आली होती. सदर बाब गावातील वन प्रेमी ना लक्षात येताच सदर प्रकरणाची त्यांनी उपवसंरक्षक अकोला यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणात उपवसंरक्षक अकोला यांनी चौकशी पथक स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र पुर्ण प्रकरणामध्ये राजनैतिक दबाव व अर्थ पूर्ण चौकही अधिक्राऱ्यांनी कोणतेही कार्यवाही केली नाही . त्या मुळे गवातील वन प्रेमी नी मुख्य वनसंरक्षक अमरावती यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्या मुळे मुख्य वनसंरक्षक अमरावती यांनी स्वतः चौकशी अधिकाऱ्याचे पाठक स्थापन करून. तत्काळ अवहाल सादर करण्याचे आदेश दिले त्या मुळे अमरावती येथील पथकाने सलग दोन दिवस पुर्ण रस्त्याचे मोजमाप व चौकशी पुर्ण केलि . त्या मुळे आता सदर प्रकरणामध्ये काय कार्यवाही होते. पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
सदर प्रकरणामध्ये कार्यवाही अंतीम टप्प्यात आहे. कही तांत्रिक बाबी होत्या त्या अधिकाऱ्याला पाठवून पूर्ण केल्या आहेत. लवकरच कार्यवाही करू.
जी के अनारसे, मुख्य वनसंरक्षक प्रा. अमरावती
ऐक ते दोन महिने सलग जेसीबी चे सहायने जंगलामध्ये अवैध उत्खनन केले आहे. मात्र वन विभगातील काही अधिकारी यांनी अर्थ पूर्ण लक्ष दिले गेले नसल्याची चर्चा आता रंगू लागल्या आहेत. त्या मुळे आता कार्यवाही होणार असल्या कारणाने अधिकाऱ्यांचे धाबेदणाणले आहे
उप वनसंरक्षक अकोला यांच्यावर सुध्हा कार्यवाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वन विभागातील मोठ्यप्रमाणावर अवैध उत्खनन झाले तरी सुध्हा याची त्यांना कल्पना कशी नव्हती. त्या मुळे त्यांच्यावर सुध्हा कार्यही करीता वरीष्ठ यांच्या कडे पाठवणार अहवाल पाठवणार असल्याची महिती आहे