Saturday, September 21, 2024
HomeMarathi News Todayएअर इंडियाच्या विमानाचे तिरुवनंतपुरम विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग…विमानात काय घडलं?

एअर इंडियाच्या विमानाचे तिरुवनंतपुरम विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग…विमानात काय घडलं?

केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. असे सांगण्यात आले आहे की कालिकतहून दमामला जाणारे विमान हायड्रॉलिक बिघाडामुळे तिरुअनंतपुरम विमानतळाकडे वळवण्यात आले, विमानात एकूण 182 प्रवासी होते.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विमान 12.15 वाजता विमानतळावर उतरवण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX3 385 मध्ये 182 प्रवासी होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कालिकतहून टेकऑफ करताना विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. यानंतर वैमानिकांनी घाईघाईत विमानाचे इंधन अरबी समुद्रात टाकून विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. यादरम्यान विमानतळावर संपूर्ण एमर्जन्सी लागू करण्यात आली होती.

या घटनेबाबत एअर इंडिया एक्सप्रेसचे वक्तव्यही आले आहे. या घटनेमुळे अडकलेल्या प्रवाशांना पर्यायी विमानाने दम्मामला पाठवले जाईल, असे विमान कंपनीने म्हटले आहे. हे विमान तिरुअनंतपुरम येथून दुपारी 3.30 वाजता उड्डाण करेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: