अमरावती : राज्यात 19 फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी झाली तर अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या पर्वावर व्याखाने झालीत, मात्र अमरावती येथील सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने आयोजित केलेलं व्याख्यान सध्या राज्यात चर्चेत असून या व्याख्यानादरम्यान भाजपचे नेते खासदार अनिल बोंडे यांना शिवव्याख्याते तुषार उमाळे यांनी थेट खासदार यांना तुम्ही मूर्ख आहात का?…असे सुनावले असल्याने राज्यात उमाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.
शहरातील सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुण्यापैकी भाजपचे नेते खासदार अनिल बोंडे यांच्या सह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून तुषार उमाळे हे शिवरायाबद्दल बोलत असताना शिवाजी महाराज यांची प्रतिमा मुस्लिम विरोधी दाखवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले गेले हे सांगत होते दरम्यान भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल भोंडे यांनी हस्तक्षेप करत म्हणाले हे शहाणे हे बंद कर, त्यावर डॉक्टर अनिल बोंडे उठून उभे झाले,
त्यावेळी वक्ते तुषार उमाळे यांनी तुम्ही लोकप्रतिनिधी असा किंवा कोणीही आगाऊपणा खपवून घेतल्या जाणार नाही महाराजांचा खरा इतिहास सांगण्याची मला संविधानाने अधिकार दिला आहे ज्याला ऐकायचं तो येका का नसेल ऐकायचं तर चुपचाप निघून गेले तरी चालेल. हा प्रसंग सुरू असताना भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे उठले आणि स्टेज जवळ गेले यावेळी कार्यक्रमात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वक्त्यामध्ये शिवजयंती वरून पेटलेला हा वाद काही काळाने संपला मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दुकान व्हायरल होत आहे…
Video – सौजन्य सोशल मिडिया