Saturday, November 23, 2024
Homeकृषीकापूस विक्रीला ब्रेक शेतकऱ्यांची कापूस कोंडी सोडवण्यासाठी शेतकऱ्याने खंडपीठात याचिका दाखल...

कापूस विक्रीला ब्रेक शेतकऱ्यांची कापूस कोंडी सोडवण्यासाठी शेतकऱ्याने खंडपीठात याचिका दाखल…

अकोला – अमोल साबळे

राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली आहे. त्यामुळे राज्यभरातच कापूस कोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी सोडवण्यात यावी, यासाठी शेतकरी नीळकंठ प्रल्हाद पाटील (रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा) यांनी औरंगाबाद खंडपीठात केंद्र शासनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, ऐन हंगामात केंद्र शासनाने ११ हजार टन कापूस आयात केला आहे. यामुळे व्यापाऱ्यांची गरज भागली आहे. व्यापारी शेतकन्यांकडील कापूस घेत नसल्यामुळे कापूस विक्री थांबली आहे. यामुळे कापसाचे भावदेखील पडले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. राज्याच्या

…..तरच कापूस विक्री शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तरच कापूस विक्री करणार असे ठरवले आहे. ही कापूस कोंडी सुटण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात ३ फेब्रुवारी रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे.

कृषिमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे कापसाला प्रतिक्विंटल १२,३०० रुपये व सोयाबीनला ८,७०० प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा म्हणून पत्र दिले आहे. मात्र, केंद्राकडून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे कापूस कोंडी झाली आहे. या परिस्थितीत कापसाला प्रतिक्विंटल ८ हजारांपर्यंतच भाव मिळत आहे. कापसाच्या शेतीसाठी उत्पादन खर्च दुपटीने वाढला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: