नांदेड – महेंद्र गायकवाड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास मोठ्या प्रमाणात सुरू आहे . सर्वच क्षेत्रात विकास मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच आज सादर झालेला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेणार आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत प्रत्येक गोष्टीला यात प्राधान्य देण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांनाही विकासाचा नवा मार्ग यातून मिळणार आहे. गोरगरिबांना मोफत अन्नधान्य पुरवठ्याचा निर्णय यासोबतच युवकांना रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या संधी, कौशल्य शिक्षण, नवे शैक्षणिक धोरण त्यातून शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. लघु उद्योगपतींच्या हितासाठी ही त्यात सुविधा तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठीही हा अर्थसंकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे . सर्वसामान्यांच्या घरांची स्वप्न पूर्ण करणारा शिवाय स्त्रियांच्या उन्नतीसाठीचाही हा अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
सात लाखांपर्यंत करमुक्त अनेकांना दिलासा दिला.इलेकट्रीक वाहनांवरील कर कमी करुन प्रदुषण कमी करण्याचा मार्ग मोकळा केला.म्हणून जनता अमृत बजेट म्हणून संबोधित आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दाखल केलेला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाचा नवा समृद्धी महामार्ग ठरेल असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.