संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब तसेच उप-मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची सह्याद्री अतिथीगृहावर एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस महाराष्ट्र राज्यातील केंद्रीय मंत्री, राज्य सरकार मधील मंत्री आणि राज्यातील खासदार उपस्थित होते.
अर्थसंकल्पाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विविध मुद्यांवर मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब तसेच उप-मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी खासदारांशी चर्चा केली. राज्यातील खासदार हे राज्याच्या विकासासाठीच देशातील सर्वोच्च सभागृहातील बुलंद आवाज असल्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगत सर्वानी एकत्रितपणे केंद्र सरकारकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करण्याचे सूचित केले.
या बैठकीत शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील
★खांमगाव-जालना रेल्वे मार्ग संदर्भात राज्य सरकारने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा..
★अकोट-अकोला-खांडवा रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजूरात दिली आहे.
★विदर्भातील वैनगंगा-नळगंगा या प्रकल्पाला मंजूरात दिली आहे तरी या प्रकल्पा मध्ये पैनगंगा या समावेश करून घ्यावा.
★ जिगाव प्रकल्पातील २५ गांवाचे पुनर्वसन करावायचे असून भूसंपादन व पुनर्वसन १९१.०१ कोटींचा प्रस्ताव संबंधित विभागा कडे दिला आहे.
★ मोताळा व मलकापूर तालुक्यातील बोदवड उपसासिंचन प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला आहे.
★ बुलडाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
★ केंद्रीय विद्यालय बुलडाणा चा परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकार कडे सादर केला आहे.सदर प्रस्ताव राज्य सरकारने शिफारस करून केंद्र सरकारडे सादर करावा.
★ बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा बळकटीकरण साठी ११७.१९ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला राज्य सरकारने सादर केला.
व नागरिकांच्या मागण्यां आणि विविध विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करून त्यासंदर्भात महत्वपूर्ण मुद्दे मांडले.
या अधिवेशनात राज्याच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना विविध केंद्रीय विभागांची मान्यता मिळवणे तसेच यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे, यासोबतच महाराष्ट्र राज्यातील विविध प्रलंबित विषय अधिवेशनामध्ये मांडून ते मंजूर करून घेणे यांसारख्या विविध विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन केले.
या बैठकीस केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे,राज्यमंत्री श्री.भागवत कराड,राज्यमंत्री श्री.कपिल पाटील,राज्यमंत्री डॉ. भारती पवार,राज्याचे महसूल मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री मा.ना.चंद्रकांत पाटील, रोहयो मंत्री मा.ना.श्री. संदीपान भुमरे,कृषी मंत्री मा.ना.अब्दुल सत्तार,शिक्षण मंत्री मा.ना.दीपक केसरकर,शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव तसेच राज्यातील खासदार आणि राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.