पहिल्या T20 मध्ये न्यूझीलंडने भारतावर 21 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. डेव्हन कॉनवेने 52 आणि डॅरिल मिशेलने नाबाद 59 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावाच करू शकला. T20 मध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाला 177 धावांचं लक्ष्य दिलं आहे, या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नसली तरी रांचीमध्ये भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली.
पहिल्या डावात सूर्यकुमार यादव बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करत असताना काही प्रेक्षक ‘जिने मेरा दिल लुटेया’…’किसी ने मेरा दिल सूत्या, सूर्या’ असे ओरडत होते. मग सूर्याने प्रेक्षकांना दाद दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या सामन्यात सूर्यकुमार यादवनेही शानदार फलंदाजी केली, सूर्याने 34 चेंडूत 47 धावांची खेळी केली, यादरम्यान सूर्याने 6 चौकार आणि 2 जबरदस्त षटकार ठोकले, अशा परिस्थितीत सूर्याने प्रथम क्षेत्ररक्षण केले आणि नंतर फलंदाजी करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. रांचीच्या मैदानात भरपूर मनोरंजन केले.