Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीआकोट ग्रामीण पोलिसांचा जुगारावर छापा…१,५३,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त...

आकोट ग्रामीण पोलिसांचा जुगारावर छापा…१,५३,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

आकोट – संजय आठवले

आकोट ग्रामिण पोलिस ठाण्याचे पो. हे. कॉं. प्रमोद ढोरे, पो. कॉं. सुनील वैराळे, रुकेश हासुले, नंदकिशोर नेमाडे, शैलेश जाधव हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बतमीदारकडून माहिती मिळाली की, अकोलखेड शेत शिवारात काही इसम ५२ ताशपत्त्यांवर हारजितचा जुगार खेळत आहेत. त्यावरून त्यांनी सदर बाबत माहिती पो. स्टे. अ आकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ह्यांना दिली.

नंतर त्यांचे मार्गदर्शनखाली अकोलखेड शेत शिवारात छापा घातला. तिथे जुगार खेळणारे देविदास लक्ष्मण शेवळे, प्रकाश काशीराम रंधे, शुभम जगराम शिरस्कार, सुधाकर नारायण जांभळे, सर्व रा. अकोलखेड व मो. सादिक शेख करीम, रा अंजनगाव ह्यांना रंगेहाथ पकडले. त्यांचेकडून रोख रु,२,५६०, ३ मोटारसायकल, व ५ मोबाईल आणि ५२ ताश पत्ते असा एकूण १,५३,५६० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई रितू खोखर उप विभागीय पोलीस अधिकारी आकोट, नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक आकोट ग्रामिण यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ प्रमोद ढोरे, पोलीस शिपाई सुनील वैराळे, शैलेश जाधव, रुकेश हासुळे, नंदकिशोर नेमाडे यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: