Friday, November 22, 2024
Homeमनोरंजनचॅरिटी गायन मैफिल ‘यादों की बहार’च्या ११व्या पर्वाचे आयोजन...

चॅरिटी गायन मैफिल ‘यादों की बहार’च्या ११व्या पर्वाचे आयोजन…

शेफर्ड विडोज होममधील वृद्ध विधवांना करणार मदत

कोविड-१९ मुळे दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर डॉ. बत्रा’ज पॉझिटिव्ह हेल्थ फाऊंडेशनने त्यांची प्रतिष्ठित वार्षिक गायन मैफिल ‘यादों की बहार’च्या ११व्या पर्वाचे आयोजन केले. या संगीत कार्यक्रमाचे नवीन पर्व १८ जानेवारी रोजी वायबी चव्हाण सभागृह, नरिमन पॉइंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते,

ज्यामध्ये पद्मश्री पुरस्‍कार-प्राप्त व डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा यांनी सदाबहार गाण्यांची मेडली सादर केली. ‘वीरझारा’, ‘रबने बना दि जोडी’, ‘बॉर्डर’ व ‘सरफोरश’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे भारतीय पार्श्वगायक व संगीत दिग्दर्शक श्री. रूप कुमार राठोड यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दाखवत वार्षिक चॅरिटी गायन मैफिलीची शोभा वाढवली.

‘यादों की बहार’ हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम आहे, जो शेफर्ड विडोज होममधील वृद्ध विधवांना मदत करत आहे. डॉ. बत्रा’ज फाऊंडेशनद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. डॉ. बत्रा’ज फाऊंडेशन वृद्ध महिलांच्या आरोग्याची काळजी घेत आहे आणि त्यांना गेल्या ३० वर्षांपासून मोफत वैद्यकीय केअर सेवा देत आहे.

डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, ‘‘वंचितांना मदत करण्यासाठी फाउंडेशनची स्थापना २२ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मला वाटते की, पैशाच्या अभावी कोणीही वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये. म्हणूनच आम्ही गरजू लोकांना मदत करण्यासाठी देशभरात मोफत क्लिनिक्स चालवतो. तसेच माझ्या मते, वृद्ध माणसांना विभक्त केले जाते, पण त्यांना कुटुंबामध्ये सामावून घेतले पाहिजे. आजी-आजोबांना दत्तक घेणे ही चांगली कल्पना आहे. देशभरातील काही वृद्धाश्रमांसाठी मी माझे प्रयत्न करत आहे.’’

प्रमुख अतिथी श्री. रूप कुमार राठोड म्हणाले, ‘‘मी डॉ. बत्रा यांना गेल्या ४० वर्षांपासून ओळखतो आणि त्यांच्या जीवनाविषयी व वंचितांपर्यंत पोहोचण्याची त्यांची तळमळ पाहून मी थक्क झालो आहे. त्यांचा आवाज चांगला आहे आणि मला आनंद आहे की, त्यांनी त्यांच्या या कौशल्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला आहे. संगीत आणि उदारता आज त्यांचा नातू हृमन यांच्या माध्यमातून त्यांच्या तिस-या पिढीपर्यंत पोहोचला आहे, याचा देखील मला आनंद आहे.’’

या प्रसंगी भारतात होमिओपॅथीचा प्रसार लोकप्रिय करण्यासाठी होमिओपॅथी अँथम लॉन्च करण्यात आले. होमिओपॅथीच्या चांगुलपणाबद्दलच्या गीताची संकल्पना पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी मांडली आहे. हे गीत प्रख्यात संगीत दिग्दर्शक संजयराज गौरीनंदन यांनी संगीतबद्ध केलेले असून महालक्ष्मी अय्यर, डॉ. राहुल जोशी आणि डॉ. मुकेश बत्रा यांनी गायले आहे. भारतातील सर्व होमिओपॅथी महाविद्यालये, होमिओपॅथिक डॉक्टर आणि होमिओपॅथी प्रेमींना ते मोफत वितरीत केले जाईल. होमिओपॅथीसाठी हे जगातील पहिले अँथम आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: