लाखपुरी येथे नियमीत बस फे-या सुरु करा- सौ. मिनल नवघरे ( माजी.पं. स. सदस्या लाखपुरी ) यांची मागणी…
वुत्तसेंवा – अतुल नवघरे
लाखपुरी : १९ , मूर्तिजापुर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल असलेल्या लाखपुरी हे तिर्थ क्षेत्र लक्षेश्वर संस्थानच्या नावाने प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील २२ गावाशी जोडल्यागेलेल्या जिल्हा परिषद सर्कल असलेल्या लाखपुरी गावात जलद बसेस व सर्वसाधारण बस गावात येत नाही. व त्यातच थोड्या फार जलद बसेस फे-या फाट्यावरून धावतात. तर कधी कधी तर जलद बस पाट्यावर थांबत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
बसची पास असुनही विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे व जवळपास २२ गावे जोडल्या गेलेल्या लाखपुरी ,पायटांगी, दुर्गवाडा , दापुरा , खापरवाडा, लोणसना , विरवाडा ,कोळसरा , दातवी , टाकळी, भुजवाडा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी व स्पर्धा परिक्षेच्या तयारी साठी मुर्तिजापुर , दर्यापुर , अकोला अमरावतीला येणे जाणे करतात त्याचे आर्थिक शैक्षणीक नुकसान होत आहे रात्री बेरात्री सुध्दा बस गावात येत नाही त्यामुळे विद्यार्थी , वुध्द ,अपंग , जेष्ठ नागरीक , महिला वर्ग प्रवाशी वर्गांची गैर सोय होत आहे व रात्री बेरात्री सुध्दा बस गावात येत नसल्यामुळे वृध्द , महिला , विद्यार्थी यांना फाट्यावरुन पायदळ यावे लागते याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
जलद व सर्वसाधारण बसफेरी दैनंदिन गावात आणण्याचे निर्देश मुर्तिजापुर व दर्य़ापुर आगराला द्यावे. जर यांची दखल ८ दिवसात जर न घेतल्यास परिवहन मंत्री यांना निवेदन देण्यात येणार व मा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुध्दा निवेदन देण्याचा इशारा माजी पं. स. सदस्या मिनल नवघरे यांच्या सह संपुर्ण खेड्यातील विद्यार्थी , गावातील नागरीकानी दिला आहे.
लाखपुरी येथे गावात बस येत नाही त्यामुळे विद्यार्थी , वुध्द ,अपंग , जेष्ठ नागरीक , महिला वर्ग प्रवाशी वर्गांची गैर सोय होत आहे व रात्री बेरात्री सुध्दा बस गावात येत नसल्यामुळे वृध्द , महिला , विद्यार्थी यांना फाट्यावरुन पायदळ यावे लागते. यावर प्रशासना व्दारे योग्य भुमिका न घेतल्यास संबंधित विभागाकडे व परिवहन मंत्री यांना याबाबत पत्र पाठविनाऱ .
सौ. मिनल नवघरे (माजी. पं. स. सदस्या लाखपुरी)
लाखपुरी येथे गावात बस येत नाही. त्यामुळे आम्हाला व आमच्या पाल्यांना १ किलो मी. अंतर अंतर असलेल्या फाट्यावर जावे लागते त्यामुळे खूप त्रास होतो.
गजानन डहाके (नागरिक लाखपुरी )
लाखपुरी येथील बसेस सुरु आहे .आज बिडी झाली त्यामुळे बस आली नाही. उद्याला टीसी आहे व काही तांत्रिक कारणास्तव बस आली नसेल आम्ही विद्यार्थी फेरेवर लागलेली बस टाकली होती. तरी काही कारणास्तव बस लाखपुरी येत नसेल तर मी स्वतः लक्ष घालून प्रश्न निकाली काढणार –
आबुलकर साहेब (आगार व्यवसथापक मुर्तिजापुर )
गावात बस येत नसल्यामळे आम्हाला शाळेत पोचण्याकरिता वेळ होतो . विद्यार्थी , वुध्द ,अपंग , जेष्ठ नागरीक , महिला वर्ग व प्रवाशी वर्गांची गैर सोय होत आहे.
ऋतूजा वरनकार ( विद्यार्थी लाखपुरी )