मेगास्टार अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिनेता अभिषेक बच्चनची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन प्रसिद्धीच्या झोतात राहते. मात्र सध्या ही अभिनेत्री न्यायालयाच्या नोटीसमुळे चर्चेत आहे. प्रत्यक्षात ऐश्वर्या रायला थकबाकीदार कर जमा न केल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. वृत्तानुसार, ऐश्वर्या रायच्या जमिनीवरील प्रलंबित कर लक्षात घेऊन नाशिकच्या तहसीलदाराने ऐश्वर्या राय नोटीस पाठवली आहे.
मिळालेल्या माहितनुसार, ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात १ हेक्टर २२ आर जमीन आहे. तिने त्या जमिनीचा एका वर्षाचा कर भरलेला नाही. त्या वर्षभराच्या कराची २१,९७० रुपयांची थकबाकी आहे. ती थकबाकी भरण्यासाठी तिला नोटीस बजावण्यात आली आहे.