सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्ह्यात गांजा विक्री करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने याबाबतीत जिल्हा पोलीस प्रमुखांनी अशांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्ह्यात तपास यंत्रणा राबवल्यानंतर खास बातमीदारांने दिलेल्या माहितीनुसार भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमणापूर रोडवरील नवले हॉलजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या अजिंक्य विजय जाधव.वय -वर्षे 30. आणि संदीप पिलाजी यादव. वय- वर्षे 27, राहणार- आळसंद. तालुका- खानापूर, जिल्हा- सांगली.
या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 8 किलो 213 ग्रम वजनाचा 1 लाख, 23 हजार 195 रुपयांचा गांजा,40 हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटरसायकल, ९ हजारांचा रेडमी कंपनीचा मोबाईल,2 हजार रुपयांचा नोकिया कंपनीचा मोबाईल तसेच 7हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण 1 लाख 81 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर आरोपींसह मुद्देमाल पुढील तपास कामी भिलवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
पुढील तपास भिलवडी पोलीस ठाणे करत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार,नितीन सावंत, संदीप पाटील,बिरोबा नरळे,जितू जाधव, सागर लवटे, संतोष गळवे, विक्रम खोत, ऋतुराज होळकर, चंदू कोळी, मारुती मस्के, मंगेश गुरव, रोहित माने, अरफान शेख,प्रवीण सुतार आदींनी केली.