न्युज डेस्क – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने गडकरींना त्यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रार प्राप्त होताच नागपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपी कॉलरचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अज्ञात कॉलरने 10 मिनिटांत दोन धमकीचे कॉल केले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात सकाळी 11.30 आणि 11.40 वाजता दोन्ही धमकीचे कॉल आले.
नितीन गडकरींच्या सुरक्षेत वाढ : नागपूर डीसीपी
नागपूरचे डीसीपी राहुल मदने यांनी सांगितले की, नितीन गडकरी यांना दोन धमकीचे फोन आले होते. तपशील प्राप्त होत असून आमची गुन्हे शाखा सीडीआरवर काम करेल. विश्लेषण चालू आहे. सध्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंत्री गडकरींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.