दानापूर – गोपाल विरघट
दानापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे त्यांचा परिणाम आता शेती पिकांवर होत आहे . येथिल शेत सर्व्ह नंबर 202 या क्षेत्रात अडीच एकर हरभरा पिकांची लागवड करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व धुक्यामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून यामध्ये मोठया प्रमाणावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला हरभरा पिक फुलोरा अवस्थेत येण्याच्या आधीच आलेल्या बुरशिजन्य रोगाने खडगे चे खडगे पडण्यास सुरुवात झाली सर्व हरभरा पीक अचानक सुकल्याने हरभरा पिकं पूर्णतःहा नेस्तनाभुत झाले.
येथील शेतकरी सुभाष रौदळे यांनी अडीच एकर क्षेत्रावर ट्रॅक्टर फिरवला असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे उत्पादनात खूप मोठया प्रमाणावर घटणार आहे. यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला असून त्वरित कृषी विभागाने पिकांचे सर्वेक्षण करून आलेल्या रोगांवर उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी होत आहे.
मी गेल्या अडीच एकर क्षेत्रावर हरभरा या पिकांची लागवड केली होती. मात्र गेल्या काही आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे, , धुक्के, व हरभरा पिकांवर मोठया प्रमाणावर अळीने हल्ला चढवला त्यात बुरशिजन्य रोगांचा मोठा परदुर्भाव झाल्याने या क्षेत्रावर फवारणी सुद्धा केली मात्र तरीही रोगांवर न थांबल्याने या क्षेत्रावर मला ट्रॅक्टर फिरवावा लागला.
सुभाष रौदळे.
शेतकरी दानापूर..