Friday, November 22, 2024
Homeराज्यउद्योगात यशस्वी होण्यासाठी महिलांनी आपल्या उत्पादनांचा ब्रॅण्ड तयार करावा : अमृता मोरे...

उद्योगात यशस्वी होण्यासाठी महिलांनी आपल्या उत्पादनांचा ब्रॅण्ड तयार करावा : अमृता मोरे पवार / सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवात उद्योजिका मेळावा उत्साहात…

सांगली – ज्योती मोरे.

उद्योगात यशस्वी होण्यासाठी महिलांनी आपल्या उत्पादनांचा ब्रॅण्ड तयार केला पाहिजे असे प्रतिपादन नॅच्यूरा फूड कंपनीच्या संचालक अमृता मोरे पवार यांनी केले. मराठा उद्योजक सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड व इतर कक्ष सांगली जिल्हा आयोजित सावित्री – जिजाऊ दशरात्रौत्सवा निमित्त मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महिला विभागाच्या उद्योजिका मेळाव्यात अमृता मोरे पवार प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. क्रीडाई संस्थेचे अध्यक्ष रविंद्र खिलारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सांगली जिल्हा अध्यक्षा प्रणिता पवार प्रमुख उपस्थितीत होत्या. महिला विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा आशाताई पाटील यांनी संस्थेची उद्दिष्टे आणि कार्यक्रम याविषयी माहिती दिली. सांगली जिल्हा अध्यक्षा ॲड. तेजस्वीनीताई सुर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुप्रिया घारगे व शरयु पाटी

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: