सांगली – ज्योती मोरे.
कल्पद्रुम ग्राउंड वरील कीर्तनात निरूपण माणसांना ध्यान केलं पाहिजे, नामस्मरण करत करत ध्यान करावं कुठल्याही वेळी ध्यान करावं झोपतानाही ध्यान करावे स्वप्नातही पांडुरंग दिसला पाहिजे. भगवत प्राप्तीसाठी भगवंताचे ध्यान केलं पाहिजे,असं निरूपण हरिभक्त परायण केशव महाराज उखळीकर यांनी करून उपस्थित भाविकांची मन जिंकली.सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंडवर सुरू असलेल्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यातील चौथं पुष्प ओवताना ते बोलत होते.