सांगली – ज्योती मोरे
सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंत दादा पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सदर पुरस्काराचे वितरण काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल दादा पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष शैलजाभाभी पाटील,
सेवा दलाचे यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप दादा चाकोते, यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन उल्हास दादा पवार ,संजय राठोड, साहित्य भूषण पुरस्कार कुलदीप देवकुळे यांना, कलाभूषण पुरस्कार हिराबाई कांबळे पाचेगावकर यांना,साहित्यरत्न पुरस्कार राहुल पाटील यांना, कलारत्न पुरस्कार दिग्दर्शक शेखर रणखांबे, शाहीर देवानंद माळी, माया पवार, मोहन अग्रवाल आदर्श समालोचक म्हणून सूर्यकांत बुरुंगे यांना, समाजभूषण म्हणून पी एल रजपूत,समाज रत्न दिशांत धनवडे,
नंदकुमार बेले, बापू सूर्यवंशी, यांना, मोहन बागल सुरेश जाधव आदर्श कार्यकर्ता म्हणून सुभाष खोत, यांना आदर्श सरपंच म्हणून विजय मोहिते यांना, आदर्श विधी सेवा पुरस्कार एडवोकेट आर.बी कोकाटे, एडवोकेट कुमार पाटील ,आदर्श पोलीस अधिकारी म्हणून सीआयडी उपाधीक्षक आसमा मुल्ला यांना, आदर्श सामाजिक संस्था म्हणून आभाळमाया फाउंडेशन ला, डॉक्टर पूजा नरवाडकर यांना आदर्श प्रिन्सिपल,शबनम माने यांना आदर्श शिक्षिका म्हणून, तर उद्योग भूषण म्हणून शितल आवटी,
उद्योग रत्न म्हणून मुबारक नदाफ, अनिल कदम यांना कृषी भूषण पुरस्कार ,मधुकर यादव यांना कृषिरत्न पुरस्कार, सुनील कुंभार यांना क्रीडाभूषण पुरस्कार, संकेत सरगर याला सुरेश माळी यांना, तर क्रीडारत्न पुरस्कार कुमारी स्वाती भस्मे हिला, तक्षशिला स्कूल यांना तर अमय पाटील यांना, आदर्श पत्रकार म्हणून विजय हुपरीकर, मोहन राजमाने, रवींद्र काळेबेरे, तानाजी जाधव,विनायक पाटील, अर्जुन हजारे, गणेश चव्हाण, मोहसीन मुजावर, पिंटी कागवाडकर,
अधिकराव लोखंडे,यांना देण्यात आला तर साधना भिलवडे ,समीक्षा कोळी, रौनक पाटील, वीर ढोले, वर्धमान गुंडे, मनस्वी कोळी, प्रमिला कोळी, पारस सर्वदे, धनश्री सर्वदे,आदींचा विशेष सत्कार्य करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अजित ढोले, अल्पसंख्यांक सेलचे अल्ताफ पेंडारी,
जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील ,सेवा दलाचे प्रदेशसचिव पैगंबर शेख ,सेवा दलाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, अशोक पाटील, शिवाजीराव कनक, अल्लाबक्ष मुल्ला, अरुण पळसुले, श्रीधर बारटक्के, आदिंसह इतर कार्यकर्त्यांनी याचे नेटके संयोजन केले.मालन ताई मोहिते, सिकंदर जमादार व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.