पुणे – मुंबई हायवे कात्रज चौक रस्यात्यावरील भाडे मालकाकडून भाडेकरूचे दुकान बेकायदेशीरपणे कोणतीही पूर्व सूचना न देता जबरदस्तीने दुकान खाली करून घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकरणा संबंधी तक्रारदार जय गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायिक गणपत भावरलाल ओझा मूळ रहिवासी राजस्थान यांनी जागा मालक परमार शंकर केसाजी यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. परंतु कोणत्याही स्वरूपात कायदेशीर कारवाई न केल्या कारणाने तक्रारदाराकडून दिनांक २३ / १२/ २०२२ रोजी पोलीस आयुक्त, पुणे शहर यांना तक्रार अर्ज दाखल केली आहे.
संबंधित प्रकार हा २१/१२/२०२२ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडला असता जागा मालक आणि त्यांच्या साथीदारांकडून जय गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे चे बेकायदेशीरपणे हातोड्याने कुलूप तोडून शटर उघडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदरील जागा ही ३३ महिन्यांच्या भाडेतत्वावर घेण्यात आली असून संपूर्ण भाडेकरारानुसार कायदेशीर नियमानांप्रमाणे घेण्यात आली आहे, जागेचा करार हा ९/७/२०२४ रोजी संपुष्टात येणार असून जागा मालकाकडून हि जागा बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रयन्त केला जात असून भाडेकरूला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे .
या प्रकारच्या विरोधात तक्राररदराने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे लेखी अर्जाच्या स्वरूपात तक्रार केली असता पोलीस स्टेशन कडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव भाडेकरूल पुणे पोलीस आयुक्तालय येथे तक्रार दाखल करावी लागतेय. या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर करण्यात यात अशी विनंती भाडेकरयाकडून अर्जात करण्यात येत आहे.