धीरज घोलप
ठाणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्यसंघट संजयजी भोकरे, महासचिव विश्वासराव आरोटे, प्रदेश प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात कोकण विभागीय अध्यक्ष नितिन मनोहर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत पहिले दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर* यांच्या जन्मदिनी “टायटेन मेडिसीटी” यांच्या संयुक्त विद्यमाने “महाआरोग्य तपासणी शिबीराचे” आयोजन करण्यात आले आहे यावेळी ठाणे शहरातील पत्रकारांचा “टायटेन मेडिसीटी” यांचे “वैद्यकिय योजना कार्ड” चे वाटप देखिल करण्यात येणार आहे.
तसेच कोकण विभागीय तथा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नितिन मनोहर शिंदे यांचा ठाणे शहर जिल्हा पदाचा कार्यभार समाप्त झाला असुन वार्षिक सभेत सर्वानुमते ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पदी जितेंद्र पाटील तसेच मुख्य सल्लागार पदी प्रमोद इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली, उपाध्यक्ष पदी सुबोध कांबळे, मिनल पवार, सचिव पदी अतुल तिवारी, कार्याध्यक्ष पदी मिलिंद दाभोळकर, प्रमुख सल्लागार पदी सतिशकुमार भावे, सल्लागार पदी मनिष वाघ, वैदही ताम्हण, संजय तांमडे, संजय भोईर, संघटक पदी मनोज कदम, सह सचिव पदी संतोष पडवळ, अश्विन कांबळे, वृत्तवाहिनी प्रमुख पदी अमित जाधव, वृत्तपत्र प्रमुख पदी राजन पाटील, छायाचित्र प्रमुख पदी सुभाष जैन, समाजमध्यम प्रमुख पदी प्रशांत मोटे, मुख्य संघटक पदी राजेंद्र गोसावी, सह संर्पकप्रमुख पदी किरण शेठ, प्रसिध्दी प्रमुख पदी अमित गुजर, देवेंद्र शिंदे, संदीप पालवी, कार्यकारी सदस्य पदी भानुदास शिंदे, कार्यकारी सदस्य पदी अभिजीत चव्हाण, ख्वाजा शेख, गणेश गव्हाणे, गफुर धारवार, मनस्वी चौधरी इतर सर्व सदस्य यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कोकणविभगीय प्रसिद्धीप्रमुख पदी विलास शंभरकर यांची नियुक्ती करण्यात आली