नरखेड – आज दिनांक 31 डिसेंबर, 2022 रोज शनिवारला वेदिक गणित कार्यशाळा जीवन विकास प्राथमिक शाळा आणि जीवन विकास विद्यालय,देवग्राम च्या विध्यार्थ्यांसाठी वर्ग 3 ते 4 आणि वर्ग 5 ते 10 करिता जवळपास 76 विध्यार्थी यांच्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे आयोजन जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथील (Resource Person) तज्ज्ञ मार्गदर्शिका माननीय डॉ. कल्याणी ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. वेदिक गणित कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे विध्यार्थ्यांना लवकरात लवकर ट्रिकस वापरून तोंडी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ,वर्ग करता यावेत ,हा प्रमूख उद्देश आहे.
या कार्यशाळेचा लाभ कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थांनी घेतला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जीवन विकास विद्यालय, देवग्राम चे माननीय मुख्याध्यापक श्री रामभाऊ बोन्द्रे सर,जीवन विकास प्राथमिक शाळा, देवग्राम चे माननीय मुख्याध्यापक श्री रविकांत बाविस्कर सर,यांनी फार मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले.
तसेच गणित विषय शिकविणारे शिक्षक श्री मनोहर कामडे, श्री योगेश दंढारे,श्री राहुल कोरडे यांनी वेदिक गणित कार्यशाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घेतला आणि कार्यशाळेसाठी सहकार्य केले. अशाप्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात वेदिक गणित कार्यशाळा पार पडली.