मागील कित्येक वर्षांपासून प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या मुंबईतील ११ लाख ग्राहकांकडून दोन महिन्यांचा मासिक बिलाची अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेची मागणी करून, बेस्ट प्रशासनाने वीज ग्राहकांची लूट सुरू केली आहे – प्रीती शर्मा मेनन….
सुरक्षा अनामत रक्कम भरण्याचे आदेश मागे न घेतल्यास यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा आम आदमी पार्टीने दिला इशारा…
अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेच्या नावाखाली वीज ग्राहकांना लुबाडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपसाठी निवडणूक निधी जमा करत आहेत का ? – प्रीती शर्मा मेनन यांचा गंभीर आरोप…
मागील कित्येक वर्षांपासून जे वीज ग्राहक प्रामाणिकपणे वीज बिल भरणा करत आहेत अशा 11 लाख ग्राहकांना दोन महिन्याच्या मासिक बिलाची अतिरिक्त अनामत रक्कम भरण्यासाठी बेस्ट प्रशासनाच्या विद्युत विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. हा सर्वसामान्य प्रामाणिक वीज ग्राहकांवर अन्याय आहे.
आधीपासूनच विजेचे दर वाढलेले आहेत. त्यातच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू देखील महाग झाल्या आहेत, असे असताना सुद्धा वीज ग्राहकांकडून अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेची मागणी करणे म्हणजे वीज ग्राहकांची अक्षरशः लूट आहे. यासाठी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने बेस्ट प्रशासनाचा जाहीर निषेध करतो.
बेस्ट विभाग हा मुंबई महागरपालिकेच्या अखत्यारीत येतो आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आता कुणाचीही सत्ता नाही. सरकारकडून फक्त एक प्रशासक नेमण्यात आलेला आहे. बाकी मुंबई महानगरपालिकेची सूत्रे शिंदे – फडणवीस सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. शिंदे – फडणवीस सरकार राज्यातील महानगरपालिका निवडणुका अजून घेतलेल्या नाहीत. अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेच्या नावाखाली वीज ग्राहकांना लुबाडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपसाठी निवडणूक निधी जमा करत आहेत का?
असा आरोप आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन बोलत होत्या. मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज कंपन्यांकडून सर्वसामान्य जनतेची लूट सुरु आहे. काही दिवसांपूर्वी बेस्टच्या विद्युत विभागाकडून बेस्टच्या वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा अनामत शुल्क भरण्याचे पत्र आले होते.
एकीकडे विजेचे दर वाढत असताना दुसरीकडे अतिरिक्त अनामत रक्कम भरण्यास सांगून जनतेस लुबाडू पाहणाऱ्या मनमानी बेस्ट प्रशासनाच्या विरोधात आज आम आदमी पार्टी मुंबई तर्फे मुंबईतील कुलाबा येथील बेस्ट मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळेस प्रीती शर्मा मेनन बोलत होत्या.
या मोर्चामध्ये प्रीती शर्मा मेनन यांच्या समवेत आम आदमी पार्टीचे, कार्याध्यक्ष रूबेन मस्कारेन्हास व द्विजेंद्र तिवारी, उपाध्यक्ष संदीप कटके व पायस व्हर्गिस, आम आदमी पार्टी मुंबईचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळेस प्रीती शर्मा मेनन यांच्या सोबत आम आदमी पक्ष मुंबईच्या शिष्टमंडळाने बेस्टच्या विद्युत विभागाचे मुख्य अभियंता ए व्ही नाईक यांनी भेट घेतली व त्यांना पक्षाच्या वतीने अतिरिक्त अनामत रक्कमेची मागणी मागे घेण्याचे निवेदन दिले.
आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष संदीप कटके यावेळेस म्हणाले की, आधीच विजेचे दर वाढलेले असताना पुन्हा अतिरिक्त अनामत रक्कम भरण्यास सांगणे म्हणजे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अन्याय आहे. आमची मागणी आहे की हे मागणीचे आदेश त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा संपूर्ण मुंबईत आम आदमी पक्ष यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार.