रामटेक – राजु कापसे
जनप्रभा संकुल येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत दिनांक २४ डिसेंबर रोज शनिवारला जनप्रभा संकुल येथील माध्यमिक शिक्षक व प्राचार्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
गुणवत्तापूर्ण सर्वांसाठी समान व व्यावसायिक कौशल्यावर आधारित शिक्षण तसेच राष्ट्रीय विकासासाठी सक्षम व चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण करणारी शिक्षणाची उद्दिष्टे ही आजवर सहाय होऊ शकली नाहीत म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक 2020 ची अंमलबजावणी म्हणजे शैक्षणिक प्रगतीमध्ये नवीन पहाट आहे असे प्रतिपादन कार्यशाळा कार्यक्रमादरम्यान डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे यांनी केले.
दिनांक 24 12 2022 रोज शनिवारला जनप्रभा संकुल येथील माध्यमिक शिक्षक व प्राचार्यांसाठी या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे यांनी शिक्षक व प्राचार्य यांच्या शंकांचे निराकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक परमार सर यांनी केले व संस्थेच्या अध्यक्षा सौ डॉक्टर ललिता चंद्रात्रे (जोशी) मॅडम यांनी शाल व श्रीफळ देऊन डॉक्टर महेश पांडे यांचा सत्कार केला.