सांगली – ज्योती मोरे.
सांगलीत वारंवार घडणाऱ्या सायकल चोरी प्रकरणाचा तपास करत असताना विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस गोपनीय खोबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरूण रमेश पांढरे वय वर्षे 18 राहणार शंकर मंदिराजवळ, अभय नगर,सांगली, हा कॉलेज कॉर्नरवर सायकल विक्रीसाठी आला असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
सायकली संदर्भात त्याच्याजवळ चौकशी केली असता सदरची सायकल ही विश्रामबाग मधील क्रांती भेळ परिसरातून चोरल्याचे त्यांने सांगितले.अधिक चौकशी केली असता अशा तऱ्हेने चोरलेल्या आणखी एकोणीस महागड्या सायकली अभ्यंकर क्लासेस,क्रांती भेळ परिसरातून चोरल्याचे आणि त्या राहत्या घरी लपवल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून 1 लाख 23 हजारांच्या 20 सायकली विश्रामबाग पोलीस ठाण्याने जप्त केल्या आहेत.
सदरची कारवाई विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, विलास मुंढे, विक्रांत घेरडे,दरिबा बंडगर, अतुल खंडागळे, संदीप घस्ते, मोहम्मद मुलानी, भावना यादव यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विशाल भिसे करत आहेत.