Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीपातूर | ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव लागला जिव्हारी...तलवार घेऊन गावात माजवली दहशत...

पातूर | ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव लागला जिव्हारी…तलवार घेऊन गावात माजवली दहशत…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील खामखेड येथे एका इसमाने हातात तलवार घेऊन दहशत माजवल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.नेमकेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याचे जिव्हारी लागल्याने पराभूत उमेदवार समर्थकाने हातात तलवार घेऊन मतदारांना मत का दिले नाही,आता सर्वांचा हिशोब होईल असे म्हणत गावात चांगलाच उच्छाद मांडला होता.

आज दि. 23/12/2022 रोजी पातूर तालुक्यातील ग्राम खामखेड येथील रहिवासी सुरेश धोंडूराम गुंजकर हा हातात तलवार घेऊन गावात शिवीगाळ करत एका घरासमोर आला असता कुसुम रामदास शेळके या वयोवृद्ध महिलेने “तू माझे घरासमोर येऊन कोणाला व का शिवीगाळ करत आहेस.” अशी विचारणा केली असता सुरेश गुंजकर याने सदर महिलेवर हल्लाबोल करून तिचा हात पिरगाळून झटापट केली असता या झटापटीत सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून कुठेतरी पडल्याने त्या वयोवृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता कृष्णा राजू काळे ( वय 24 ) रा.खामखेड यास सुरेश गुंजकर याने धक्काबुक्की करीत असताना कृष्णा यांच्या छातीजवळ तलवार लागल्याने केवळ त्याचे दैव बलवत्तर म्हणूनच फक्त खरचटले गेले.

खामखेड ग्रामपंचायत मध्ये मागील तीस वर्षांपासून गुंजकर परिवारातीलच सरपंच निवडून येत होता,अशे असतांना यावेळेस पहिल्यांदा त्यांचा पराभव झाल्यामुळे सुरेश गुंजकर याच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने त्याने हातात तलवार घेऊन गावातील मतदारांनी आम्हाला मतदान केले नसून “आता सर्वांचा हिशोब होईल,आज तलवार आणली उद्या ज्याने आम्हास मतदान केले नाही त्यास बंदुकीच्या फैरी दाखवतो,” असे फिर्यादी ने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सदर प्रकरणी कृष्णा राजू काळे यांचे फिर्यादीवरून आरोपी सुरेश धोंडूराम गुंजकर रा.खामखेड याच्याविरोधात पातूर पोलिसांत अप.क्र.411/22 कलम 4,25 शस्त्र अधिनियम 1959 तसेच कलम 323,504,506 भादंसं नुसार गुन्हा दाखल झाला असून सदर आरोपी फरार असून आरोपीचा शोध व अधिक तपास पातूर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: