न्युज डेस्क – उत्तर आणि पूर्व भारतातील बहुतांश राज्यांमध्ये धुक्याने कहर सुरु केला असून. दाट धुक्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक वाईट परिणाम रेल्वेवर झाला आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच बुधवारी 200 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याप्रमाणे ऑनलाइन ट्रेनची स्थिती तपासा
जर तुम्हाला आज ट्रेनने प्रवास करायचा असेल, तर घरापासून स्टेशनवर जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ट्रेनची स्थिती तपासली पाहिजे. प्रवासी ट्रेनची स्थिती ऑनलाइन पाहू शकतात. भारतीय रेल्वे आणि IRCTC वेबसाइट आणि NTES एपवर रद्द, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांबद्दल माहिती उपलब्ध आहे. रेल्वेची स्थिती जाणून घेण्यासाठी या दोन महत्त्वाच्या रेल्वे वेबसाइट्स
https://enquiry.indianrail.gov.in/mntes
https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2