Saturday, September 21, 2024
Homeराज्यवनमजूर, वनरक्षक, वनपालांच्या अडचणी लवकरच निकाली काढणार...वेणुगोपाल रेड्डी

वनमजूर, वनरक्षक, वनपालांच्या अडचणी लवकरच निकाली काढणार…वेणुगोपाल रेड्डी

शरद नागदेवे, नागपूर

नागपूर- प्रधान सचिव वने यांनी महाराष्ट्र राज्यातील वनमजूर, वनरक्षक व वनपाल यांच्या अडचणी संबंधात वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने हरिसिंग सभागृह , नागपूर येथे बैठक घेतली. बैठकीला महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री वाय एल पी राव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष श्री अजय पाटील व कार्याध्यक्ष श्री माधव मानमोडे यांनी चर्चा केली.

या चर्चेत वनरक्षक, वनपाल यांची अन्याकारक वेतनश्रेणीत सुधारणा , महाराष्ट्रात मानीव दिनांक नुसार सामान सेवा ज्येष्टता यादी, अतिदुर्गम क्षेत्रात गस्ती करिता शासकीय दुचाकीची व्यवस्था, सातव्या वेतनानुसार सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे लाभ , प्रत्येक विभागीय कार्यालयात शाहिद स्तंभ उभारणे, शाहिद झालेल्यांच्या कुंटुंबाला सॅन २००६ पासून नुकसान भरपाई देणे, अतिरिक्त कामाचा कर्तव्य भत्ता – आहार भत्ता मिळणे, वनरक्षक भरती मध्ये पोलीस विभागाप्रमाणे वनरक्षक वनपालांच्या पाल्यांना आरक्षण, साप्ताहिक राजा, साप्ताहिक रजा न उपभोगल्यास अतिकालिक भत्ता, लग्नाच्या व स्वतःच्या वाढदिवसाची रजा मिळणे, कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना सुरु करणे, गणवेश व साहित्य भत्ता जो प्रलंबित आहे तो मिळणे लागलीच होणाऱ्या वनरक्षक भरतीत वनमजूर यांना सॅन २०१२ च्या निर्णयानुसार सामावून घेणे, संपकालीन ११ दिवसाचे वेतन मिळणे, वन्यजीव विभागातील पन्नास वर्षावरील वनरक्षक वनपालांना बदली मध्ये प्रादेशिक विभागात प्राधान्य या सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली.

प्रधान सचिव श्री रेड्डी यांनी मंत्री महोदयांसमवेत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन संघटनेला दिले. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( प्रशासन ) सौ शौमिता बिश्वास सुद्धा चर्चेच्या वेळी उपस्थित होत्या. संघटनेचे उपाध्यक्ष श्री शिवसंभ घोडके, श्री विशाल मंत्रीवार, श्री सतीश गडलिंगे, श्री प्रभाकर अंकारी, श्री भारत मडावी, श्री विजय रामटेके, श्री पूणम बुद्धावर, श्री आनंद तिडके, श्री अरुण पेंदोरकर, श्री राजेश पाथर्डे, श्री विजय मोरे, श्री ईश्वर मांडवकर, श्री रामेश्वर धोंडगे, श्री सहदेव डोसाल्वार, श्री शंकर रंगूवर इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: