पातूर – निशांत गवई
पातुर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या अनेक गावांमध्ये घरकुलाचा हप्ता न मिळाल्याने अनेकांना घर बांधण्यास मोठी अडचण निर्माण होत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे .तसेच घरकुल लाभार्थी यांच्या खातेमध्ये पहिला चेक तत्काळ टाकण्यात येतो व लाभार्थी घरकुल बांधकाम सुरू करतो.
परंतु लाभार्थी यांना दुसरा व तिसरा हप्ता मिळळण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती मध्ये चकरा माराव्या लागतात तरी सुद्धा चेक पडत नसल्याचे अनेक लाभार्थी यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पंचायत संमती मध्ये लाभार्थी यांना काम धंदे सोडून फक्त हप्त्यातून दोन ते तीन चकरा माराव्या लागत आहेत.
अधिकारी म्हणतात बघतो,घरकुल अभियंता म्हणतो पाहणी करावी लागते.कागदाची पूर्तता किंवा कोणत्याही त्रुटी काढून हप्ता लाबविला जातो.तसेच अनेक घरकुल लाभार्थी यांनी उसने पैसे करून नाईलाजाने घर बांधण्यास सुरवात करतो तरी लाभार्थ्यांना हक्काचा हप्ता मिळत नाही.लोकप्रतिनिधी किंवा कोणाच्या वसिल्याने लवकर हप्ता टाकल्या जातो परंतु गोरगरिब लाभार्थ्यांना महिने दोन महिने थांबावे लागतं.यांचे नेमके कारण काय असा प्रश्न गोरगरीब लाभार्थी यांना पडला आहे.
सोमवार रोजी असंच तुंलगा येथील घरकुल बाबत चेक न टाकल्याने मंगेश इंगळे या सामजिक कार्यकर्ते यांनी पंचायत समिती मध्ये गदारोळ केला होता.त्रास जर झाला तर याचे परिणाम वाईट होतील अशी संबधित कर्मचारी यांना तंबी दिली.या गँभिर प्रकाराकडे वरिष्ठ यांनी लक्ष देऊन ही समस्या तत्काळ दूर करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.