Saturday, September 21, 2024
Homeराजकीयआकोट तालुक्यात वंचितची जोरदार मुसंडी…१७ ग्रामपंचायतींवर फडकला निळा… उर्वरित २० सरपंचांकरिता राजकीय...

आकोट तालुक्यात वंचितची जोरदार मुसंडी…१७ ग्रामपंचायतींवर फडकला निळा… उर्वरित २० सरपंचांकरिता राजकीय पक्षांची धावाधाव…

आकोट – संजय आठवले

आकोट तालुक्यातील एक ग्रामपंचायत अविरोध झाल्याने एकूण ३६ ग्रामपंचायतींची मतगणना शांततेत पार पडली असून यामध्ये वंचित आघाडीने जोरदार मुसंडी मारून ३७ पैकी तब्बल १७ सरपंच पदे आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवले आहे. उर्वरित २० ठिकाणी स्थानिक पातळीवर स्थापन केलेल्या विविध पॅनल्सनी बाजी मारली असून त्या सरपंचांना आपल्या नावे खपविण्याकरिता अन्य राजकीय पक्षात धावाधाव सुरू झाली आहे.

या मतगणनेत अनेक ठिकाणी कडवी झुंज बघावयास मिळाली. तर काही ठिकाणी धनदांडग्यांच्या विरोधात कफल्लक उमेदवारांना जनतेने उचलून धरल्याचे दिसले. या मतगणने दरम्यान ग्रामपंचायत धारेल येथील अनुसूचित जाती महिला राखीव प्रभागातील सौ. अरुणा अतुल ओवे आणि सौ. वृषवल्ली सुमेध ओवे या दोन्ही उमेदवारांना समान मते पडली. यामध्ये ईश्वर चिट्ठीद्वारे सौ. अरुणा अतुल ओवे ह्या विजयी झाल्या.

ADS

ग्रामपंचायत करतवाडी रेल्वे सरपंच पदाकरिता सौ. शितल रुपेश पेठे यांना १६५ मते तर सौ. सरला प्रमोद पेठे यांना १६४ मते मिळाली. यामध्ये फेर मतमोजणी करण्यात येऊन सौ. शितल पेठे यांना विजयी घोषित केले गेले. ग्रामपंचायत अकोलखेड येथील सरपंच पदाचे उमेदवार दिगंबर सम्रत पिंपराळे यांचा विजय हा या मतगणनेतील लक्षवेधी ठरला. अतिशय गरीब परंतु तितकाच कामसू म्हणून गावकऱ्यांनी त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले.

विशेष म्हणजे त्यांचे विरोधात मोठी धनशक्ती असल्यावरही त्यांचा हा विजय जनशक्तीचा विजय ठरला आहे. ग्रामपंचायत बांबर्डा येथील सरपंच पद अनुसूचित जमाती करिता राखीव होते. परंतु तेथे पात्र उमेदवारच नसल्याने येथील सरपंच पद रिक्त ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायत अकोली जहांगीर येथील अनुसूचित जमाती करिता आरक्षित सरपंचपदी एकाच उमेदवाराने अर्ज केल्याने तेथे अरुण उत्तम वाघे हे अविरोध विजय घोषित केले गेले.

ग्रामपंचायत धामणगाव चोरे येथे गावकऱ्यांच्या सामंजस्याने पूर्ण जागा अविरोध झाल्या आहेत. ग्रामपंचायत लोतखेड येथे प्रहार पक्षाची आपसातच झुंज लागली. त्यामध्ये प्रहार चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांचे सरपंचासहित पूर्ण पॅनल विजय झाले. मात्र त्यांना स्वतःला पराभूत व्हावे लागले. त्यांचे विरोधात जिल्हा परिषद सदस्य पती निखिल गावंडे यांनी सर्व जागा लढवल्या होत्या. तिथे अटीतटीच्या लढतीत अन्नपूर्णा रघुनाथ ओवेकर ह्या अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या.

ग्रामपंचायत निवडणुका कधीच राजकीय पक्षांचे नावाने लढविल्या जात नाहीत. त्याला छेद देऊन वंचितने यावेळी पक्षाच्या नावावर या निवडणुका लढवल्या. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्थानिक पातळीवर तयार केलेल्या पॅनल्स द्वारे निवडणूक लढविल्यावर विजयी सरपंच आपल्या सोयीच्या पक्षाचे कुंकू लावतो. त्यामुळे राजकीय पक्ष त्या सरपंचावर स्वतःचा दावा ठोकतात. परिणामी कोणत्याच राजकीय पक्षाचे बळ ध्यानात येत नाही.

तसे होऊ नये आणि आपले बळाचा अंदाज लागावा म्हणून यावेळी वंचित आघाडीने पक्षाच्या नावावर निवडणुका लढविल्या. आणि त्यात या पक्षाला कमालीचे यश मिळाल्याचे दिसून आले आहे. या पक्षाने ३७ पैकी तब्बल १७ सरपंच पदांवर सरशी प्राप्त केली आहे. त्यामुळे हे १७ सरपंच निर्विवादपणे वंचितचेच ठरणार आहेत. तर उर्वरित २० सरपंच आपल्या नावे खपवण्याकरिता अन्य राजकीय पक्षांना मात्र पटवापटवी करावी लागणार आहे. आकोट तालुक्यातील विजय सरपंचांची नावे पुढीलप्रमाणे…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: