Friday, November 22, 2024
Homeदेशविजय दिनानिमित्त शहीद जवानाना राष्ट्रपतींकडून श्रद्धांजली...

विजय दिनानिमित्त शहीद जवानाना राष्ट्रपतींकडून श्रद्धांजली…

न्युज डेस्क – विजय दिवसानिमित्त CDS जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि भारतीय नौदलाचे उपप्रमुख व्हाइस एडमिरल एसएन घोरमाडे यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. यादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचून शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी सांगितले की, 1971 च्या युद्धात देशाच्या सशस्त्र दलांनी दिलेले विलक्षण शौर्य देश कृतज्ञतेने लक्षात ठेवतो. त्यांच्या अतुलनीय धैर्याच्या आणि त्यागाच्या कथा प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात.

1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ विजय दिवस साजरा केला जातो. त्यानंतरच बांगलादेश हा स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. पूर्वी हा पाकिस्तानचा भाग होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: