Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीनरखेड । गौतस्करी होत असल्याची नागरिकांमध्ये ओरड…जनावरे घेऊन जाणारा पीकअप उलटला.

नरखेड । गौतस्करी होत असल्याची नागरिकांमध्ये ओरड…जनावरे घेऊन जाणारा पीकअप उलटला.

जलालखेडा येथील घटना…मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली घटना…वाहनातील तिघांना किरकोळ जखम…गाडीत होती जनावरे…एका वासराला पाठवले गोंडेगाव येथील गोरक्षणमध्ये उपस्थित नागरिकांनी चार ते पाच गौवांश असल्याची चर्चा…पण पोलिसांच्या ताब्यात फक्त एक जखमी गैवांश लागले

नरखेड

जलालखेडा येथे वरूड वळण मार्गावर जनावरे घेऊन जाणारा पीकअप उलटला असून वाहनात असलेल्या जनावरांना व व्यक्तीं जखमी झाले आहे. वाहन चालक रोशन परसराम चौरे वय वर्ष 28 रा. पुनर्वसन जलालखेडा घटनास्थळावरून पसार झाला असून श्रीराम मारोतराम उमक वय वर्ष 50 रां. मदना, हर्षल भीमराव निकोसे वय वर्ष 29 रा. जलालखेडा, राजेंद्र वामनराव विरखडे वय वर्ष 50 रा. मदना हे तिघेही जखमी झाले असून असून जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारसाठी नागपूर येथे पाठवण्यात आले आहे.

वाहन चालक रोशन चौरे वेगाने वाहन चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून त्याला वळण मार्गाचा अंदाज न आल्यामुळे वाहन सरळ जाऊन नाल्यात कोसळले. पीकअप एमएच 15 डीके 1955 या क्रमांकाची पीकअप असून गाडीतील जनावरांना किरकोळ जखम झाली असून त्यात बसलेल्या व्यक्तींना जखम झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचली व घटनेचा पंचनामा करून एका जनावराला गोरक्षक बेलोना येथे पाठवण्यात आले आहे. तर इतर जनावरे घटनास्थळा वरून पसार झाली आहे. वाहन चालका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जलालखेडा पोलिस करत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: