तालुक्यात दोनशे पेक्षा जास्त बंधारे श्रमदानातुन होनार…
नरखेड – अतुल दंढारे
जल हे जीवन आहे.तेव्हा काळाची गरज ओळखुन काटोल तालुक्यात श्रमदानातुन वनराईचे दोनशे पेक्षा जास्त बंधारे व्हावे अशी आग्रही भुमीका काटोल पंचायत समीतीचे सभापती संजय डांगोरे यांनी पंचायत समीती सभाग्रुहात संपन्न झालेल्या ग्राम सेवक आणि अधीकारी यांचे सभेत मांडली.
काटोल तालुक्यातील अनेक गावे डार्क झोन मधे असुन ,पाण्याची पातळी वाढविन्यासाठी तथा पाण्याची टंचाई कमी करन्यासाठी अनेक उपाया पैकी एक म्हनुन नाल्यावर श्रमदानातुन वनराई बंधारे बांधुन ,पाणि अडविने आवश्यक आहे.
काटोल तालुक्यातील रिधोरा ग्राम पंचायत अंतर्गत बोरखेडी शिवारात वनराईचा बंधारा बांधुन कामाचा शुभारंभ पंचायत समीतीचे सभापती संजय डांगोरे यांचे उपस्थीतीत करण्यात आला. याप्रसंगी सभापती संजय डांगोरे यांचे समवेत काटोल पंचायत समीतीचे खंडविकास अधीकारी संजय पाटील ,प.स.सदस्य श्री धम्मपाल खोब्रागडे,सरपंच नलीनी राऊत,
क्रुषी अधीकारी श्री थोटे, क्रुषी विस्तार अधीकारी श्री भक्ते ,मोहन काळे,देवेंद्र इंगोले,वैभव राऊत,भास्कर तरटे,प्रशांत पवार,दिपक डोंगरे,कमलेश बेलसरे,विकी मुसळे,सचीन पवार,माधव इंगळे आदींची उपस्थीती यावेळी होती.