रामटेक – राजु कापसे
ब्लड फॉर बाबासाहेब ६ डिसेंबर २०२२ या अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण जगभरात ऐच्छिक रक्तदान करून बाबासाहेबांना एक विशाल अभिवादन करण्यात येत आहे.
या अभियानाची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचावी या हेतूने ४ डिसेंबर २०२२ला आयोजित पत्रकार परिषदेत ब्लड फॉर बाबासाहेब समन्वय समितीचे साक्षोधन कडबे यांनी “कोविडच्या कार्यकाळात रुग्णांना उपचारासाठी लागणारी रक्ताची गरज व रक्तपेढीतील रक्ताचा अपुरा तुटवडा लक्षात घेता ६ डिसेंबर २०२१ ला दीक्षाभूमी नागपूर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन १११७ व्यक्तींनी बाबासाहेबांना रक्तदानातून अभिवादन केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या उत्थानासाठी केलेले अपार कष्ट, त्याग व समर्पणाची जाण राखून तळागाळातील माणसाला उपचारादरम्यान भासणारी रक्ताची गरज आणि रक्तदानाच्या संदर्भात समाजात असलेले अज्ञान अंधश्रद्धा व गैरसमज याचा विचार करून ६ डिसेंबर २०२२ ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मानवसेवेच्या राष्ट्रीय कार्यात योगदान देता यावे तसेच बाबासाहेबांना रक्तदानाच्या माध्यमातून कृतिशील अभिवादन करता यावे.
या उदात्त हेतूने जगभरात भारतीय समाजातील विवीध सामाजिक व सेवाभावी संघटनांच्या वतीने जगातील ७ देशात भारतातील २०राज्य आणि महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात ५०० हून अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करून लाखोंच्या संख्येत लोक एकत्र येत आहेत.
यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून मानवी समाजातील नैसर्गिक समता प्रस्थापित करण्यास व भारतीय समाजातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्यास हातभार लागेल असा विश्वास व्यक्त केला तसेच रामटेक येथिल शिबिरात ५०० हून अधिक व्यक्ती रक्तदान करतील अशी आशा व्यक्त केली.
याप्रसंगी समन्वय समितीतील सहभागी संस्थांचे प्रतिनिधी साक्षोधन कडबे, चेतन मेश्राम, प्रवीण कांबळे, डॉ. प्रदीप बोरकर, वैभव तुरक, नितीन भैसारे, ॲड. प्रफुल्ल अंबादे, मनिष खोब्रागडे, जितेंद्र कोसे, राज मेश्राम, रजत गजभिये, पंकज माकोडे, राजेंद्र कांबळे,पंकज चौधरी, सुभाष चव्हाण तसेच आकाशझेप फाऊंडेशन, भारतीय बौध्द महासभा, रिआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रामटेक, रमाई बौध्द विहार समिती रामटेक, कल्याण मित्र बौध्द विहार समिती शितलवाडी,
महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच रामटेक तालुका, आंबेडकरी युवा विचार मंच रामटेक तालुका, पत्रकार संघटना रामटेक तालुका, महिला भगिनी मंडळ रामटेक, ग्राम पंचायत कर्मचारी युनियन रामटेक तालुका, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रामटेक तालुका, परिवर्तन मंच व बहुद्देशीय संस्था रामटेक, युवा सरल असोशिएशन, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, अखिल भारतीय तांडा सुधार समिती, वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायजेशन रामटेक,
राजे ग्रूप रामटेक, राम राज्य ढोल ताशा पथक रामटेक, रामटेक तालुका वकील संघ, सह्याद्री जनविकास बहु. संस्था, युवा चेतना मंच, एकलव्य युवा सेना रामटेक, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना-रामटेक तालुका, युनिव्हर्सल युथ फाउंडेशन, सरपंच सेवा संघ रामटेक तालुका, मायनॉरिटी वूमन अपलिफ्ट सोसायटी ऍण्ड ट्रस्ट,
युनिर्व्हसल युथ फाऊंडेशन, मेडीकल असोसिएशन रामटेक, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन रामटेक, सरपंच सेवा संघ, रामटेक तालुका, धम्मज्योति बुध्दविहार समिती, रामटेक तालुका ऍग्रो डीलर असोसिएशन, रामटेक कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी लीमि. रामटेक यांचे प्रतिनिधी हे प्रामुख्याने उपस्थित होते.