Friday, November 22, 2024
Homeराजकीयआ देखे जरा, किसमे कितना है दम..!

आ देखे जरा, किसमे कितना है दम..!

रामटेक – राजु कापसे

जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे,तसतसा निवडणुकीचा ज्वर वाढु लागला आहे..उमेदवारीकरीता नामांकन भरण्याला केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने नेते आणि कार्यकत्याची धावपळ वाढली असून फुल्ल जोशात कामाले लागले आहेत..हम भी किसीसे कम नही .किसमे मे कितना है दम याप्रकारे छाती ठोकुन दम मारू लागले आहेत..

मौद्या तालूक्यात पंचवीस ग्रामपंचायतीकरीता निवडणुका होऊ घातल्या आहेत .राजकीय पक्षाच्या नेत्याची प्रतीष्ठा पणाला लागली असून व्युव्हरचना आखणे ,गणित मांडणे आदीचा ससेमीरा सुरू आहे .बरेच ठिकाणी सरपंचपदासाठी उमेदवारी दाखल करण्याचा हुरूप गावातील व्यक्तीना चढला आहे.

मौदा तालूक्यातील अरोली येथील १३ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये महिलाकरीता सर्वसाधारण असणाऱ्या प्रशांतभुरे समर्थक गटामधुन सरपंच पदाकरीता रोशनी प्रशांत भुरे यांनी नामांकन दाखल केले..प्रशांत भुरे हे अरोली येथिल मा.जी ग्रामपंचायत सदस्य पद ,संजय गांधी निराधार समीती मौदा तालुका शिवसेना प्रमुख जवाबदारी सांभाळली आहे….

रोशनी भुरे यांच्या विरोधात अजुन पर्यत विरोधक म्हणुन उमेदवारी नामांकन दाखल कोणीही केलेली नाही तरी सुद्धा योगेश देशमुख जि.प सदस्य काॕग्रेश गटाकडुन शेवटच्या दिवशी नामांकन दाखल केले जाईल..तसेच कोदामेंढी येथे ११ सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायतीमधुन बि.जेपी गटामधुन माजी सरपंच भगवान बावनकुळे विरुदध काॕग्रेशा गटातुन नवीन चेहरा म्हणुन आशिष बावनकूळे यांच्यात थेट लढत दिसून येत आहे..बर्याच ठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल करण्याचा हुरूप हौशेगौवशे यांना चढला आहे…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: