Friday, November 22, 2024
HomeHealthPiles causes and care | मूळव्याध म्हणजे का आणि जाणून घ्या लक्षणे...

Piles causes and care | मूळव्याध म्हणजे का आणि जाणून घ्या लक्षणे…

डॉ. अजय विलासराव – अवचारगुरुकृपा हॉस्पिटल,चिखली

मूळव्याध म्हणजे का?

मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्याठिकाणी सूज येते. यामुळे, गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक मुळव्याढच्या आजाराने त्रस्त असतात. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्वाचे असते.

मूळव्याधच्या समस्येमध्ये शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येत असते. तसेच शौचाच्या ठिकाणी खाज होणे, आग होणे, जळजळ आणि भयंकर वेदना होत असतात. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तसुद्धा जात असते.

मुळव्याध होण्याची कारणे –

मुळव्याधचा त्रास होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. प्रामुख्याने चुकीचे खानपान, बद्धकोष्ठता, सततचे बैठे काम, कुटुंबात पाईल्सची अनुवंशिकता असणे, प्रेग्नन्सी आणि लठ्ठपणा असल्यास मूळव्याधची समस्या होऊ शकते.

मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्याठिकाणी सूज येते. यामुळे, गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक मुळव्याढच्या आजाराने त्रस्त असतात. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्वाचे असते.यासाठी आपले पोट नियमित साफ होणे आवश्यक आहे.

चुकीच्या आहारामुळे मूळव्याधची समस्या होऊ शकते..
चुकीच्या खानपान यांमुळेही मूळव्याधची समस्या होऊ शकते. विशेषतः वारंवार बेकरी प्रोडक्ट, जास्त तिखट व मसालेदार पदार्थ, मांसाहार, अंडी, चिकन व पचनास जड असणारे पदार्थ खाण्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, फळे यांचे प्रमाण कमी असल्यासही हा त्रास होऊ शकतो.कारण हिरव्या पालेभाज्या सारख्या आहारात पोट नियमित साफ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तंतुमय घटकांचे प्रमाण मुबलक असते. मात्र जर असा आहार न घेतल्यास तंतुमय पदार्थांची कमतरता होऊन बधकोष्टता होते व परिणामी हा आजार वाढतो

मूळव्याधची लक्षणे – मूळव्याध समस्येमध्ये गुदाच्या शिरांना सूज येते, त्याठिकाणी कोंब किंवा मोड येतात. गुदाच्या ठिकाणी भयंकर वेदना होणे, खाज येणे, जळजळ व आग होणे अशी लक्षणे असतात. शौचाच्या वेळी त्रास अधिक वाढतो. काहीवेळा शौचातुन रक्तही जात असते. अधिक प्रमाणात रक्त जाण्यामुळे ऍनिमिया होऊ शकतो. पूर्ण पोट साफ झाल्यासारखे न वाटणे, भूक मंदावणे, अशी मूळव्याधची लक्षणे असतात. रुग्णाचे वजन कमी होते. मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.

उपचार – हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.

आपल्यासाठी काही आयुर्वेदिक योग – सुरणाचा कंद आणून त्याची वरची साल काढून टाकावी. आतील गुलाबी भागाचे गाईच्या तुपात परतावून खाव्यात. यात मीठ टाकू नये.नंतर अधूनमधून ही भाजी खात जावी. रोजच्या जेवणामध्ये गाईच्या तुपाचे प्रमाण वाढवावे. ताजे लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.) रक्तस्राव असल्यास निरंजनचे फळ आणून ते १००ml पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करून ते पाणी प्यावे.असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री) इसबगोल आणून त्यात पाणी घालून रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळून प्यावे. झेंडूची १० पाने आणि ३ ग्रॅम काळी मिरी पाण्यात वाटून गाळून प्यायल्याने मुळव्याध मधून रक्त येणे थांबते.

महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घ्यावे. नारळाच्या शेंड्या जाळून राख बनवून चाळून घ्यावी . नारळाचे हे भस्म तीन–तीन ग्रॅम सकाळी , दुपारी उपाशी पोटी ताकाबरोबर आणि सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे . एकदाच घेतल्याने मूळव्याधीत अपेक्षित फायदा होतो . रुईचा चिक व हळद यांच्या मिश्रणाचा १ ठिबका रोज रात्री मूळव्यधावर लावावा.

गायीच्या १ कप कोमट दूधात अर्ध्या लिंबाचा रस पिळून दूध फाटण्या पूर्वीच त्वरीत प्यावे . हा प्रयोग रक्त मूळव्याधजन्य रक्तस्त्रावाला त्वरीत बंद करतो . उपरोक्त प्रयोग एक किंवा दोन वेळेपेक्षा जास्त वेळा करू नये . आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा . जर वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल. जर आपल्यालाही मूळव्याधचा त्रास असेल व बऱ्याच औषधी घेऊनही आपल्याला आराम वाटत नसेल तर एकदा निश्चितच आम्हाला संपर्क करा खात्रीशीर औषधी आपल्याला घरपोच सुद्धा मिळू शकतील.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: