Wednesday, November 6, 2024
Homeगुन्हेगारीचेन स्नचिंग करणाऱ्या अल्पवयीन तरुणास एलसीबीने केले जेरबंद - ७० हजारांचा मुद्देमाल...

चेन स्नचिंग करणाऱ्या अल्पवयीन तरुणास एलसीबीने केले जेरबंद – ७० हजारांचा मुद्देमाल जप्त…

सांगली – ज्योती मोरे

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने खास बातमीदाराच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय रेकॉर्डवरील इराणी टोळीतील एका अल्पवयीन तरुणास सांगलीतील सह्याद्री नगरातील मैदानातून आज सकाळी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पँटच्या खिशात सतरा ग्रॅम वजनाचे पदकासह असलेले अर्धवट तुटलेले 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आढळून आले.

सदर मुद्देमाला विषयी विचारणा केली असता त्यांने आपल्या साथीदारासह मोटरसायकलचा वापर करून एसटी स्टँड जवळील शिवराज पेट्रोल पंपाजवळ रस्त्याकडेला थांबलेल्या एका महिलेच्या गळ्यातील गंठण हिसडा मारून तोडून पळवले होते अशी कबुली दिली. दरम्यान मुद्देमाल जप्त करून मुद्देमाला सह अल्पवयीन तरुणास पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार अच्युत सूर्यवंशी, बिरोबा नरळे, सागर लवटे, जितेंद्र जाधव, संदीप गुरव ,निलेश कदम, अनिल कोळेकर, संदीप पाटील, सागर टिंगरे ,उदय माळी, विक्रम खोत, पोलीस हेड कॉन्स्टेबल नवीन आदींनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: