Friday, November 22, 2024
Homeमनोरंजनविक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा...व्हेंटिलेटर सपोर्टही निघू शकतो...रुग्णालयाची माहिती

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा…व्हेंटिलेटर सपोर्टही निघू शकतो…रुग्णालयाची माहिती

पुणे- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत असून हात, पाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही निघू शकेल असं वाटत आहे. त्यांचा रक्तदाब आणि हदयाची क्रिया स्थिर आहे, अशी माहिती शिरीष याडगीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. शिरीष याडगीकर यांनी बोलताना म्हटले कि, श्वसनाचा त्रास होत असल्याने विक्रम गोखले यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं असून, प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळत असून विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: