अमरावती – आज दि. 21/11/22 सोमवार रोजी, महापरिवर्तनम फाऊंडेशन च्या वतीने संपूर्ण अमरावती शहर व जिल्हयात गाव तिथे उद्द्योग गाव तिथे रोजगार ही मोहीम राबविण्याचा निश्चय करण्यात आला. त्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये मा.खासदार नवनीत राणा, व मा.आमदार रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती लाभली असता त्यांनी त्वरीतच निर्णय घेऊन प्रामुख्याने होतकरू युवक-युवतींनी उद्योजक बना जेणे करून जास्तीत जास्त रोजगार निर्माण होईल त्यासाठी या संधीच सोनं करण्याचे आव्हान देखील सर्वच जनतेला केले आहे.
करिता www.mahaparivartanam.org या वेबसाईटवर आपला आवडता उद्योग निवडून नोंदणी करावी लवकरच आपणास कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येईल हे देखील सांगण्यात आले. सोबतच त्यांनी महापरिवर्तनम फाऊंडेशन चे संस्थापक श्री. चंद्रकांत इंगळे, डायरेक्टर. गौरव गवई, सुमेध जामनिकर, मनोज रामटेके, नयन बारसे, अमर शेळके, मयुर वासनिक, डॉ. हेमंत काळे व संपूर्ण समुहाच्या सदस्यांचे अभीनंदन करून मनोबल वाढवले, महापरीवर्तनम फाऊंडेशन च्या सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी मा.खा. नवनीत राणा व मा.आ. रवी राणा यांचे देखील आभार व्यक्त केले.