Wednesday, October 23, 2024
Homeराज्यबिबट्याने केली रोह्याची शिकार महेंद्री शिवारातील घटना : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, शेतीची...

बिबट्याने केली रोह्याची शिकार महेंद्री शिवारातील घटना : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, शेतीची कामे खोळंबली…

नरखेड – अतुल दंढारे

महेंद्री (ता. नरखेड) शिवारात शुक्रवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवून एका रोह्याची शिकार केली. शनिवारी सकाळी शेताकडे गेलेल्या शेतकऱ्यांना रोही मृतावस्थेत आढळून आला. याबाबत वनविभागाला सूचना देण्यात आली. वनविभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मागील वर्षभरापासून या भागात बिबट्याचा वावर असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन महिन्यांपूर्वी तीन पाळीव कुत्री व महिनाभरापूर्वी एका वासराची बिबट्याने शिकार केली आहे. चांदणीबर्डी गावात हा बिबट शिरला होता. बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी, मजूर शेतात जाण्यास घाबरत असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.

या भागात बिबट्याच्या मुक्तसंचार असल्याबाबत वनविभागाला अनेकदा माहिती देण्यात आली. परंतु एक-दोन दिवस तात्पुरती पेट्रोलिंग करून वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांचा आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी, मजुरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करणार कोण, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.

वनाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एखाद्या वेळी फोन केल्यास, ते फोनसुद्धा घेत उचलत नाही व उलट उत्तरे देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा बळी गेल्यावर वनविभागाला जाग येईल काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: