सांगली – ज्योती मोरे
14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालदिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला प्रतिमा पूजन करून लहान गट ते चौथी च्या 3 गटामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरू , शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले.
झाशीची राणी लक्ष्मीबाई, वारकरी ,डॉक्टर ,वकील , झाड वेशभूषा , वर्तमानपत्र वेशभूषा, वाहतुकीचा संदेश देणारी वेशभूषा , उद्योजक , पुढारी , खेळाडू , शेतकरी , सैनिक, इंदिरा गांधी , गायिका ,बालकामगार भारतीय सैनिक अशा अनेक विविधांगी वेशभूषा सर्व विद्यार्थ्यांनी सादर केल्या त्याचबरोबर त्यांचे पालक उपस्थित झाले होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . नेहताज कनवाडे यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा व प्रास्ताविक श्री सुनिल चौगुले यांनी केले,
सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ . मेघा मगदूम मॅडम व सौ . स्वाती माळी मॅडम तसेच स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्री नितिन बनसोडे सर व सौ बबिता कांबळे यांनी काम पाहिले. आलेल्या पालकांचे आभार श्री अस्लम सनदी सर यांनी मानले . तसेच या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.