Friday, September 20, 2024
Homeखेळमहाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत खुल्या गटांमध्ये सेनव्होरा डिसोजा मुंबई व चिन्मय...

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेत खुल्या गटांमध्ये सेनव्होरा डिसोजा मुंबई व चिन्मय सोमय्या मुंबई उपनगर विजयी…

सांगली – ज्योती मोरे.

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने सुरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचवी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस रँकिंग स्पर्धेचे आयोजन नव कृष्णा व्हॅली क्रीडा संकुल एमआयडीसी येथे करण्यात आलेले असून सदर स्पर्धेच्या चौथ्या दिवशी अतिशय चुरशीच्या लढतीत अंतिम स्पर्धेमध्ये खुल्या गटांमध्ये सेनव्होरा डिसोजा मुंबई बँक ऑफ बडोदा प्रथम व मुलांच्या गटांमध्ये चिन्मय सोमय्या प्रथम क्रमांक पटकविले बाकीचा निकाल पुढीलप्रमाण खुला गट महिला एकेरी स्पर्धेत सेनव्होरा डिसोजा मुंबई बँक ऑफ बडोदा,

प्रथम मधुरिका पाटकर मुंबई उपनगर द्वितीय समृद्धी कुलकर्णी सोलापूर तृतीय मधुश्री पाटील मुंबई उपनगर तृतीय खुला पुरुष गट चिन्मय सोमय्या मुंबई उपनगर प्रथम,पार्थ केलकर मुंबई उपनगर द्वितीय, तन्मय राणे मुंबई उपनगर तृतीय,भार्गव चक्र देव पुणे तृतीय 19 वर्षाखालील गटामध्ये मुली अनन्या चांदे मुंबई प्रथम मुक्ता दळवी मुंबई मिताली पुरकर नाशिक तृतीय अनन्या सांगोलकर नागपूर तृतीय 19 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत सिद्धांत देशपांडे ठाणे,

प्रथम आदित्य जैन पुन्हा द्वितीय अक्षत जैन मुंबई उपनगर तृतीय अर्णव करणावर मुंबई उपनगर तृतीय 17 वर्षाखालील मुली आर्या सांगडकर ठाणे प्रथम काव्या भट्ट ठाणे द्वितीय अनन्या चांदी मुंबई उपनगर तृतीय प्रियांका गुप्ते ठाणे तृतीय 17 वर्षाखालील मुले नील मूल्य पुन्हा प्रथम उदित देव ठाणे द्वितीय असे यादव ठाणे तृतीय ध्रुव शहा मुंबई उपनगर तृतीय अशा प्रकारे 19 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुला मुलींच्या स्पर्धा चौथ्या दिवशी संपन्न झाल्या वरील स्पर्धकांचे प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

दिनांक 14 व 15 नोव्हेंबर रोजी 11,13 व 15 वर्षाखालील मुला मुलींच्या स्पर्धा होणार असून दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सर्व खेळाडूंच्या बक्षीस समारंभ दुपारी तीन वाजता आयोजित केला आहे अशी माहिती सुरज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीणजी लुंकड यांनी दिली यावेळी महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सुरज फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: