Sunday, November 24, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर | नराधम बापाला मुलासह सुनेने केले ठार...दोघांना अटक...गोरेगाव येथील धक्कादायक घटना...

मूर्तिजापूर | नराधम बापाला मुलासह सुनेने केले ठार…दोघांना अटक…गोरेगाव येथील धक्कादायक घटना…

अर्जुन बलखंडे,नरेंद्र खवले, मूर्तिजापूर

मूर्तिजापूर तालुक्यातील व बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव (पुंडलिक महाराज) या गावात काल रात्री धक्कदायक घटना समोर आलीय, या गावात मुलाने आणि सुनेने 60 वर्षीय बापाला ठार करून त्याचावर डीझेल टाकून जाळले. विनोद मारोती चोपडे व सौ. शालू विनोद चोपडे असे आरोपींचे नाव असून दोघांही बोरगाव मंजू पोलिसांनी अटक केली असून त्यांनी गुन्हा कबूल केल्याचे समोर आले आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या गोरेगाव (पु.म) येथे एक इसम जळालेल्या परिस्थितीत मृतावस्थेत पडला असल्याची माहिती बोरगाव मंजू पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील सोळके यांना मिळाली घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तात्काळ घटना स्थळ गाठले असता तेथे एक इसम जळालेल्या अवस्थेत मृत्यू पावला असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अधिका तपास केला असता सदर इसम हा 60 वर्षीय मारोती गेदाजी चोपडे राहणार गोरगाव येथीलच असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाच्या पार्श्वभागावर धारदार शस्त्राने हल्ला करून मग मृतदेह जळून टाकल्याचे निर्शनात येताच पोलिसांनी आपले तपास चक्र फिरविण्यास सुरुवात केली असता मृतक मारोती चोपडे याचा मुलगा 48 वर्षीय विनोद मारोती चोपडे याच्यावर संशयाची सुई येऊन ठेपली पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता. आपल्या पत्नीशी आपल्याच वडिलांचे अनैतिक संबंध असल्याने त्याचा राग मनात घेऊन मी व माझी पत्नी सौ. शालू विनोद चोपडे वय 38 वर्ष आम्ही दोघांनी मिळून वडील मारोती गोदाजी चोपडे यांची हत्या केल्याची कबुली दिली.

मृतक हा राक्षसी प्रवृतीचा असल्याचे समोर आले आहे, बायको असून सुद्धा हा आपल्याच सुनेशी अनैतिक संबध ठेवायचा, गेल्या अनेक वर्ष पासून त्याचा मुलगा हे सर्व सहन करत होता. त्याचे असे कृत्य बघून बायको माहेरी त्याला मोठे नातवंड असून ही तो कुणाचीच पर्वा करायचा नसल्याचे समजते. बोरगाव मंजू पोलिसांनी या दोन्ही आरोपींन ताब्यात घेतले असून अधिक तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: